Asus Smartphone: तब्बल १८ जीबी रॅमसह येणाऱ्या Asus च्या फोनची ‘या’ दिवशीपासून होणार भारतात विक्री; पाहा किंमत

नवी दिल्ली : बहुचर्चित स्मार्टफोनची लवकरच भारतात विक्री सुरू होणार आहे. कंपनीने याबाबतची घोषणा केली आहे. ROG Phone 5 सीरिजमधील हा स्पेशल एडिशन दमदार फीचर्ससह येतो. हा जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यात १८ जीबी रॅम मिळते. या प्रीमियम फोनसह कंपनी गेमर्सला शानदार अनुभव प्रदान करत आहे. वाचा: ROG Phone 5 Ultimate ला यावर्षी मार्चमध्ये लाँच करण्यात होते. मात्र, फोनला भारतात सादर केले नव्हते. आता अखेर कंपनीने भारतात फोनच्या सेलची माहिती दिली आहे. भारतात Asus ROG Phone 5 Ultimate चा पहिला सेल २६ डिसेंबरला आहे. या फोनला ई-कॉमर्स साइट वरून १६ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून खरेदी करता येईल. भारतात या फोनची किंमत ७९,९९९ रुपये आहे. याआधी ROG Phone 5 ला देशात ४९,९९९ रुपयात लाँच केले होते. Asus ROG Phone 5 Ultimate मध्ये ROG Phone 5 पेक्षा काही भन्नाट फीचर्स दिले आहेत. ROG Phone 5 Ultimate मध्ये रियरला मोनोक्रोम PMOLED डिस्प्ले दिला आहे. सिस्टम अलर्ट आणि स्टेट्ससाठी हा कस्टमाइजेबल अ‍ॅनिमिशन डिस्प्लेचे काम करतो. फोनमध्ये Qualcomm Snapdragon ८८८ प्रोसेसरसह १८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज दिले आहे. ROG Phone 5 Ultimate मध्ये यूनिक स्पेशल अ‍ॅडिशन एमो-बॉक्स, एक एआर अनबॉक्सिंग एक्सपीरियन्स आणि स्पेशल अ‍ॅडिशन फ्रॉस्टेड ग्लास मिळतो. फोन ROG AeroCooler ५ एक्टिव कूलिंग एक्सेसरीसह येतो. यात फिजिकल ट्रिगर बटन स्पेशल अ‍ॅडिशन व्हाइट ROG AeroCase सह दिले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EoNqkW

Comments

clue frame