Amazon Prime membership: Amazon ने दिला मोठा झटका, आता प्राइम मेंबरशिपसाठी खर्च करावे लागणार 'एवढे' पैसे

नवी दिल्ली : ने यूजर्सला मोठा झटका दिला आहे. आजपासून भारतात membership घेणे महाग झाले आहे. कंपनीने मेंबरशिपची किंमत ५०० रुपयांपर्यंत वाढवली आहे. वाचा: नवीन प्लाननुसार, Amazon Prime मेंबरशिपच्या वर्षभरासाठीच्या प्लानसाठी आता १,४९९ रुपये जास्त खर्च करावे लागणार आहे. या प्लानची आधी किंमत ९९९ रुपये होती. म्हणजेच आता प्लान ५०० रुपयांपर्यंत महाग झाला आहे. Amazon Prime च्या मासिक प्लानची किंमत आधी १२९ रुपये होती. यात देखील ५० रुपयांनी वाढ झाली असून, आता महिन्याभरासाठी १७९ रुपये मोजावे लागतील. Amazon Prime च्या तीन महिन्यांच्या प्लानसाठी ४५९ रुपये खर्च करावे लागतील. आधी या प्लानची किंमत ३२९ रुपये होती. म्हणजेच, किंमतीत ३९ टक्के वाढ झाली आहे. प्राइम मेंबरशिपसह यूजर्सला प्राइम , आणि चा अ‍ॅक्सेस मिळतो. Amazon ने कन्फर्म केले आहे की macOS साठी देखील कंपनी Prime Video अ‍ॅप आणणार आहे. अ‍ॅपला Apple च्या Mac App Store वरून मोफत डाउनलोड करू शकता. हे नवीन अ‍ॅप Prime Video यूजर्सला प्राइम व्हिडिओ कंटेंट स्ट्रीम अथवा डाउनलोड करण्याची परमिशन देते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी टेलिकॉम ऑपरेटर्सने देखील प्रीपेड प्लान्सचे दर वाढवले आहेत. आता Amazon Prime ने देखील मोठा झटका दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ylSvJD

Comments

clue frame