Xiaomi: शाओमीचे Apple च्या पावलावर पाऊल, भारतीय यूजर्ससाठी उपलब्ध करणार ‘ही’ खास सर्व्हिस

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच दिग्गज टेक कंपनी ने ग्लोबल सेल्फ-रिपेअर प्रोग्रामची सुरुवात केली आहे. या अंतर्गत यूजर्सला ओरिजिनल अ‍ॅपल पार्ट्स, टूल्स आणि मॅन्यूअलचा उपयोग करून स्वतः डिव्हाइस दुरुस्त करता येणार आहे. आता देखील अ‍ॅपलच्या पावलावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. वाचा: देखील Apple मॉडेलचे अनुकरण करण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच रिपेअर प्रोग्राम सादर करू शकते. कंपनीने या अपकमिंग सर्व्हिसची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. कंपनीचा उद्देश यूजर्सचा अनुभव अधिक शानदार व्हावा व यूजर फ्रेंडली सर्व्हिसचा आहे. कंपनीद्वारे शेअर करण्यात आलेल्या इमेजद्वारे संकेत मिळतात की, टूल्स, मॅन्यूअल आणि पार्ट्स सारख्या सेवा आणि रिपेअरची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते. कंपनीने याबाबत अधिक खुलासा केलेला नाही. लवकरच याबाबतची अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. कंपनी या रिपेअर प्रोग्रामला सर्वातआधी भारतात सादर करेल. शाओमीने म्हटले आहे की, शाओमी यूजर्सच्या प्रती असलेली बांधिलकी अधिक मजबूत करण्यासाठी Xiaomi केअर्स नावाने पुढील सर्व्हिस सर्व सुविधांसाठी वन-स्टॉप सॉल्यूशन असेल. दरम्यान, शाओमीच्या तिसऱ्या तिमाहीत उत्पन्नात ८.२ टक्के वृद्धी झाली आहे. कंपनीला ओप्पो आणि विवोकडून जोरदार टक्कर मिळत आहे. कंपनीला मोठा नफा झाल्याचे देखील पाहायला मिळते. आता सेल्फ रिपेअर प्रोग्रामद्वारे कंपनीला भारतीय यूजर्सला आकर्षित करण्यात यश मिळते का नाही, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3larmnq

Comments

clue frame