WhatsApp sticker: WhatsApp चॅटिंग होणार आणखी मजेदार, येतेय हे जबरदस्त फीचर

नवी दिल्लीः WhatsApp सध्या एका नवीन फीचरवर काम करीत आहे. याच्या मदतीने यूजर आपली पसंतीचे स्टिकर्स बनवू शकतील. सध्या यूजर फक्त त्याच स्टिकर्सचा वार करते. जे कंपनी किंवा थर्ड पार्टी अॅप्सचे स्टिकर्स पॅक मध्ये मिळते. ९१ मोबाइल्सच्या रिपोर्टनुसार, व्हाट्सअॅप मध्ये स्वतः स्टिकर क्रिएट करणाऱ्या फीचरला बीटा व्हर्जन मध्ये पाहिले गेले आहे. लवकरच हे स्टेबल व्हर्जन मध्ये उपलब्ध केले जाईल. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कंपनी स्टिकर एडिट करण्यासाठी स्पेशल टूल्स सुद्धा देवू शकते. स्टिकर क्रिएट करणाऱ्या फीचरच्या मदतीने यूजर कोणत्याही इमेजला स्टिकर मध्ये कन्वर्ट करू शकतात. स्टिकर्सला आणखी मजेदार बनवण्यासाठी कंपनी काही कस्टमाइजेशन टूलचा वापर करू शकते. या फीचरच्या स्टेबल व्हर्जनचे रिलीज डेट संबंधी अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मेसेज डिलीट करण्याची वेळ वाढणार व्हाट्सअॅप लवकरच मेसेज डिलीट करण्याची वेळ लिमिटला वाढवू शकतात. WABetaInfo च्या रिपोर्ट नुसार व्हाट्सअॅप सध्या आणखी एका नवीन फीचरवर काम करीत आहे. हे फीचर आल्यानंतर चॅट मध्ये पाठवण्यात आलेल्या मेसेजला ७ दिवस आणि ८ दिवसांपर्यंत delete for everyone केले जावू शकते. अजून यूजर सेंड करण्यात आलेल्या मेसेजला फक्त १ तास, ८ मिनिट आणि १६ सेकंदाच्या आत delete for everyone करू शकता. लीक रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, व्हाट्सअॅपची प्लानिंग आहे की, ते मेसेज डिलीट करण्याची वेळ लिमिट संपणार आहे. हे फीचर अजूनही डेव्हलेप फेज मध्ये आहे. असे मानले जात आहे की, कंपनी ७ दिवसांपर्यंत मेसेज डिलीट करण्याऐवजी अपडेट्समध्ये विना टाइम लिमिट मेसेज डिलीट करणाऱ्या फीचरला रोलआउट करू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CQ0G1n

Comments

clue frame