Vodafone-Idea: Vi चा भन्नाट प्लान, यात मिळेल २००GB डेटा आणि Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन

नवी दिल्ली : () आणि ने आपल्या सर्व प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. आता यूजर्सला आधीच्या तुलनेत १४० रुपयांपर्यंत जास्त खर्च करावा लागेल. यूजर्सला आता प्लानमध्ये अधिक फायदे मिळतील, मात्र पैसे जास्त द्यावे लागणार आहेत. वीआयच्या प्लानमध्ये नाइट बेनिफिट्स आताही मिळणार आहे. वाचा: वीआयच्या प्लानमध्ये यूजर्सला रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा वापरण्याची सुविधा मिळते. कंपनीकडे ५६ दिवस वैधतेसह येणारा प्लान असून, याची किंमत ७०१ रुपये आहे. प्लानमध्ये डेली डेटासह यूजरला ३२ जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. वीआयचा ७०१ रुपयांचा प्लान Vodafone-Idea च्या या प्रीपेड प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. या व्यतिरिक्त यूजर्सला ३२ जीबी अतिरिक्त डेटा मिळेल. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. याशिवाय यात १ वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन देखील मोफत दिले जात आहे. प्लानमध्ये यूजर्सला २ जीबी क्लाउड स्टोरेज बॅकअप मिळतो. तसेच, विकेंड डेटा रोल ओव्हरची देखील सुविधा दिली जात आहे. Vodafone-Idea ला टक्कर देण्यासाठी एअरटेलकडे ६९९ रुपयांचा प्लान आहे. यामध्ये देखील दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानची वैधता ५६ दिवस आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/319suRr

Comments

clue frame