नवी दिल्ली : ने मलेशियात आपला नवीन Vivo Y76 5G ला लाँच केले आहे. लाँचिंगसोबत फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. यामद्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. वाचा: Vivo Y76 5G ची किंमत ची किंमत MYR १,२९९ (जवळपास २३ हजार रुपये) आहे. ही किंमत फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोन कॉस्मिक ऑरोरा आणि मिडनाइट स्पेस रंगात येतो. Vivo Y76 5G चे स्पेसिफिकेशन Vivo Y76 5G हा अँड्राइड ११ आधारित FunTouch OS १२ वर काम करतो. फोनमध्ये ६.५८ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०८ पिक्सल आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. Vivo Y76 5G चा कॅमेरा विवोने या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात अपर्चर एफ/१.८ सह ५० मेगापिक्सल प्रायमरी लेंस, दुसरा २ मेगापिक्सल लेंस आणि तिसरा २ मेगापिक्सल सेंसर आहे. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. Vivo Y76 5G ची बॅटरी Vivo Y76 5G मध्ये ४४ वॉट फ्लॅश चार्ज सपोर्टसह ४१०० एमएएचची बॅटरी मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ वी५.१, यूएसबी टाइप सी पोर्ट, जीपीएस, एफएम रेडिओ आणि फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3r3dMpC
Comments
Post a Comment