नवी दिल्लीः Vi New Prepaid Tariffs Plan:वोडाफोन-आयडिया (Vi) नवीन टॅरिफ प्लानला लाँच केले आहे. हे प्लान आजपासून लागू करण्यात आले आहेत. आता यूजर्संना वाढलेल्या किंमतीने रिचार्ज करावा लागणार आहे. वोडाफोन आयडियाच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नवीन प्रीपेड प्लनची किंमत ९९ रुपयांपासून सुरू होऊन २३९९ रुपयांपर्यंत आहे. यूजर्संना २१९ रुपयाच्या प्लानमध्ये अनलिमिटेड बेनिफिट्स सारखे कॉलिंग आणि डेटा सारखी सुविधा ऑफर केली जात आहे. सोबत टेलिकॉम कंपनीकडून डेटा टॉप अप प्लानच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. Vi चा ९९ रिचार्ज प्लान वोडाफोन आयडियाच्या प्लानमध्ये ९९ रुपयाचा टॉकटाइम ऑफर केला जातो. सोबत २०० एमबी डेटा मिळेल. टॉकटाइम लिमिट संपल्यानंतर १ पैसे प्रति सेकंद या प्रमाणे चार्ज केले जाईल. Vi चा १७९ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाचा १७९ रुपयाचा प्लान मध्ये २८ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत ३०० एसएमएस तसेच २ जीबी डेटा ऑफर केला जातो. Vi चा २६९ रुपयाचा रिचार्ज प्लान वोडाफोन आयडियाचा २६९ रुपयाचा रिचार्ज प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये डेली १ जीबी डेटा शिवाय, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. Vi चा २९९ रुपयाचा रिचार्ज प्लान वोडाफोन २९९ रुपयाचा रिचार्ज प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये डेली १.५ जीबी डेटा मिळेल. सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, डेली १०० एसएमएस ऑफर केले जातील. Vi चा ३५९ रुपयाचा रिचार्ज प्लान वोडाफोन आयडियाचा ३५९ रुपयाचा रिचार्ज प्लानमध्ये २८ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये डेली २ जीबी डेली १०० एसएमएस दिले जाते. Vi २८९९ रुपयाचा रिचार्ज प्लान वोडाफोन आयडियाचा २८९९ रुपयाच्या प्लानमध्ये ३६५ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेली १०० एसएमएस आणि डेली १.५ जीबी डेटा सोबत येतो. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l6YWeh
Comments
Post a Comment