Top Smartphones: २०२१ मध्ये 'या' ब्रँडने विकले सर्वाधिक स्मार्टफोन्स, पाहा दुसऱ्या क्रमांकावर कोण

नवी दिल्ली : Android स्मार्टफोन्सचे खूप चांगले मॉडेल असूनही, iPhone खूप लोकप्रिय आहे. स्मार्टफोन युजर्समध्ये आयफोनची प्रचंड क्रेझ असून यंदाही iPhoneची लोकप्रियता कायम आहे. IDC विश्लेषक तज्ञांच्या मते, २०२१ च्या पहिल्या तीन तिमाहीत हा सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन बनला आहे. यादरम्यान Apple चे चार मॉडेल टॉप ४ च्या यादीत सामील झाले. या यादीत Samsung चा एक बजेट Android फोन, Samsung आपले स्थान बनवण्यात यशस्वी झाला आहे. वाचा: रिपोर्टनुसार, टॉप-५ बेस्ट सेलिंग लिस्टमध्ये iPhone 12, Galaxy A12, iPhone 11, iPhone 12 Pro Max आणि iPhone 12 Pro यांचा समावेश आहे. iPhone 13 ची विक्री तिसर्‍या तिमाहीत सुरू झाली आणि तोपर्यंत या यादीत समाविष्ट होण्याइतकी लोकप्रियता iPhone 13 ला मिळाली नाही. फोनच्या वाढत्या मागणीमुळे iPhone 13 चे हे मॉडेल लवकरच लोकप्रिय होऊ शकते. असे म्हणता येईल. प्रत्येक मॉडेलचे किती युनिट्स विकले गेले याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तिसऱ्या तिमाहीत ग्लोबल चिप स्टोरेजचा Xiaomi वर मात्र खूप परिणाम झाला आहे. काउंटरपॉइंट रिसर्च आणि कॅनालिसच्या मते, अलिकडेच जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता बनलेली चीनी कंपनी तिसऱ्या तिमाहीत पुन्हा तिसऱ्या स्थानावर गेली आहे. चिपच्या तुटवड्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत, Xiaomi चे ४३.९ दशलक्ष स्मार्टफोन विकले आहेत. गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण ६ टक्के कमी आहे. काउंटरपॉईंटच्या अहवालानुसार, इतर कंपन्यांचे डिव्हाइसेस आणि उत्पादनांच्या श्रेणीचा फटका Xiaomi ला बसला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31c4UmF

Comments

clue frame