Smart Tv Offers: फक्त ५ हजार रुपयांत घरी आणा Samsung चा हा लेटेस्ट Smart TV, असे मिळवा ऑफर्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली:Flipkartवर एक नवीन सेल सुरू झाला असून या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही आणि टीव्हीवर उत्तम सूट मिळत आहे. जर तुम्ही दिवाळी सेलचा फायदा घेऊ शकला नसाल तर तुम्ही या सेलमध्ये अतिशय स्वस्तात टीव्ही खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट ग्रँड होम अप्लायन्सेस सेल ५५-इंच, ४३-इंच आणि ३२ इंच टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. सॅमसंग, Mi, Redmi यांसारख्या कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही अतिशय कमी किमतीत सेलमध्ये उपलब्ध आहेत. Samsung 32 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर मोठी सूट आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर. Samsung 32-इंच स्मार्ट टीव्ही ऑफर आणि सवलत : Samsung 32-इंच स्मार्ट टीव्हीची लाँच किंमत १९,९०० रुपये आहे, परंतु Sale मध्ये स्मार्ट टीव्ही १७,४९० रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच TV वर १२ % सूट दिली जात आहे. Samsung 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर बँक ऑफर : तुम्ही आयसीआयसीआय क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊन टीव्ही विकत घेतल्यास, तुम्हाला १,२५० रुपयांची Instant सूट मिळेल. म्हणजेच टीव्हीची किंमत १६,२४० रुपये असेल. यानंतर एक एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे टीव्हीच्या किंमतीत लक्षणीय घट होईल. Samsung 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर एक्सचेंज ऑफर : Samsung 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ११,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. तुमचे मॉडेल चांगल्या स्थितीत आणि नवीन असल्यास तुम्हाला जास्त सवलत मिळेल. तुम्ही पूर्ण ऑफ मिळवण्यात यशस्वी झालात तर ,५,२४० रुपयांत मध्ये Samsung 32 inch स्मार्ट टीव्ही घरी आणू शकाल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CN88KA

Comments

clue frame