Samsung :सॅमसंग चाहत्यांसाठी बॅड न्यूज, कंपनी Galaxy Note बनवू शकणार नाही, हे आहे कारण

नवी दिल्ली: कंपनी २०२१ मध्ये नवीन Galaxy Note सीरीज लाँच करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. सॅमसंगने यावर्षी फॅबलेटपेक्षा आपल्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोनला स्पष्टपणे प्राधान्य दिले आहे. तसेच, कंपनीने गेल्या वर्षीच्या ची विक्री देखील सुरू ठेवली आहे. पण, कंपनी येत्या काही महिन्यांत हे करणे थांबवेल. असे दिसते आहे. एक नवीन अहवाल सूचित करतो की, Samsung या वर्षाच्या अखेरीस Galaxy Note 20 Series चे उत्पादन थांबवू शकते. वाचा: 20 Series ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षभर जुनी असूनही बाजारात जोरदार विक्री सुरूच आहे. तुम्हाला अजूनही या फोनमध्ये रस असल्यास, तुम्ही अधिकृत सॅमसंग ब्लॅक फ्रायडे २०२१ डील्स लाभ घेऊन सवलतीत त्याचा लाभ घेऊ शकता. Galaxy Note 20 आणि कायम नसतील . दक्षिण कोरियाच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, Galaxy Note 20 मॉडेलचे उत्पादन या वर्षाच्या अखेरीस थांबेल. Samsung ने मुळात Galaxy Note series रद्द केली आहे. या वस्तुस्थितीशी या निर्णयाचा संबंध असू शकतो. याशिवाय, अन्य कोणतेही कारण समोर आलेले नाही. सर्व लीक Galaxy S22 Ultra कडे निर्देश करतात, ज्याची रचना Note सारखी आहे. एस पेन डिव्हाइसमध्येच संग्रहित केले जाऊ शकते. पुढील महिन्यात उत्पादन संपल्यास, रिटेलर्स आणि कैरियर्स द्वारा इन्वेंट्री विकल्यानंतर Galaxy Note 20 चे नवीन युनिट उपलब्ध होतील. ज्या मालिकेने सॅमसंगसाठी खूप काही केले आहे आणि आजपर्यंत एक अतिशय निष्ठावान चाहतावर्ग कायम ठेवला आहे, तिचा कुठेतरी कटू अंत होईल. हे मात्र नक्की. कारण, Galaxy सीरिजमुळे सॅमसंगने बाजारात वेगळे स्थान निर्माण केले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CRWYUX

Comments

clue frame