नवी दिल्ली : लवकरच आपला नवीन स्मार्टफोन ला लाँच करणार आहे. सुरुवातीला या फोनला चीनमध्ये लाँच केले जाईल व त्यानंतर इतर बाजारात सादर केले जाईल. फोनच्या लाँचिंग तारखेबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, लीकमध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबाबत खुलासा झाला आहे. फोनमध्ये ८ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. फोनची किंमत १,४९९ युआन (जवळपास १७,४०० रुपये) असू शकते. वाचा: चे फीचर आणि स्पेसिफिकेशन रिपोर्टनुसार, फोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.५ इंच फुल एचडी+ LCD डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येऊ शकतो. फोनमध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ९०० चिपसेट प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी यात एलईडी प्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह २ मेगापिक्सल डेप्थ आणि २ मेगापिक्सल मॅक्रो शूटर मिळेल. सेल्फीसाठी यात फ्रंटला Sony IMX471 सेंसरसह १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. पॉवरसाठी फोनमध्ये ३० वॉट VOOC ४.० फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली जाईल. फोनमध्ये एनएफसी सपोर्ट मिळेल. काही रिपोर्टनुसार, हा फोन यावर्षी एप्रिलमध्ये लाँच झालेल्या Realme Q3 पासून प्रेरित आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cIsJoG
Comments
Post a Comment