Micromax: ठरलं! मायक्रोमॅक्स 'या' तारखेला लाँच करणार स्वस्तात मस्त स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : भारतीय ब्रँड ने आपल्या IN सीरिजच्या डिव्हाइससोबत भारतात पुनरागमन केले आहे. कंपनीने या बजेट सीरिज अंतर्गत चार नवीन डिव्हाइसला लाँच केले आहे. भारतीय स्मार्टफोन कंपनीने नवीन स्मार्टफोनला लाँच करून बरेच दिवस झाले आहेत. आता नवीन लीक रिपोर्टनुसार, कंपनी १५ डिसेंबरला भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते. कंपनीने अद्याप अधिकृतपणे लाँचबाबत माहिती दिलेली नाही. वाचा: Micromax १५ डिसेंबरला भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनी कोणत्या डिव्हाइसला लाँच करेल याबाबत माहिती समोर आलेली नाही. कंपनीने अधिकृतपणे याबाबतची माहिती दिल्यानंतरच याचा खुलासा होऊ शकेल. कंपनी भारतात इन नोट १ प्रो ला लाँच करणार असल्याचे लीकमध्ये म्हटले होते. हा फोन नोट १ चे पुढील व्हेरिएंट असेल. डिव्हाइसला गीकबेंचवर MediaTek Helio G९० SoC आणि ४ जीबी रॅमसह पाहण्यात आले आहे. फोन अँड्राइड १० आउट ऑफ द बॉक्सवर काम करेल. In 2b मायक्रोमॅक्सचा काही दिवसांपूर्वीच लाँच झालेला बजेट स्मार्टफोन आहे. फोनच्या ४ जीबी + ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये आहे. या डिव्हाइसमध्ये ६.५२ इंच एचडी+ डिस्प्ले, Unisoc T६१० SoC आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळते. फोनमध्ये रियरला ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेंसर आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसरचा समावेश आहे. सेल्फीसाठी या डिव्हाइसमध्ये वॉटरड्रॉप नॉच अंतर्गत ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DTMYf8

Comments

clue frame