नवी दिल्ली : बहुचर्चित स्मार्टफोनला आता ऑनलाइन खरेदी करता येणार आहे. फोनला विक्रीसाठी च्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आले आहे. ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीसाठी आता नोंदणी करण्याची गरज नसून, थेट कंपनीच्या वेबसाइटवरून ऑर्डर करू शकतात. वाचा: JioPhone Next ला ऑनलाइन स्टोरवर देखील त्याच किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. ग्राहक बँक डिस्काउंटसह स्वस्तात फोनला खरेदी करू शकतात. JioPhone Next ची किंमत JioPhone Next ला भारतात ६.४९९ रुपयात उपलब्ध करण्यात आले आहे. ही किंमत २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. रिलायन्स डिजिटलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ग्राहकांना Yes Bank च्या क्रेडिट कार्डवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट दिले जाईल. तर American Express कार्ड्सवर ७.५ टक्के डिस्काउंट मिळेल. EMI क्रेडिट कार्ड ऑप्शन ३०५.९३ रुपये प्रती महिन्यापासून सुरू होतो. कंपनी या फोनवर मॅन्यूफॅक्चरिंग वॉरंटी देत होईल. तसेच, शिपिंगसाठी कोणतेही चार्ज घेतले जाणार नाही. JioPhone Next चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स JioPhone Next मध्ये ५.४५ इंच स्क्रीन Corning Gorilla Glass ३ प्रोटेक्शनसह दिली आहे. याचे रिझॉल्यूशन ७२०x१४४० पिक्सल आहे. फोन अँटी-फिंगरप्रिंट कोटिंगसह येतो. फोन प्रगती ओएसवर काम करतो. Pragati OS हे भारतीय यूजर्ससाठी अँड्राइडचे ऑप्टिमाइज्ड व्हर्जन आहे. या फोनमध्ये १.३GHz Qualcomm Snapdragon २१५ क्वाड कोर प्रोसेसरसह २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने वाढवू शकता. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ३,५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32wJd1A
Comments
Post a Comment