Jio Data Plans: ८४ जीबी डेटासह १ वर्षासाठी Disney+ Hotstar मोफत, पाहा रिलायन्स जिओचे ‘हे’ स्वस्त प्लान्स
नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी ग्राहकांसाठी एकापेक्षा एक शानदार प्लान्स सादर करत असते. कंपनीकडे प्रत्येक सेगमेंटचे प्लान्स उपलब्ध आहे. तुम्ही जर डेटा, कॉलिंगसह ओटीटी बेनिफिट्ससोबत येणारे प्लान्स शोधत असाल तर जिओकडे असे अनेक प्लान्स आहेत. जिओच्या अशाच काही स्वस्त प्लान्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Jio चा १५१ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ३० दिवस असून, यात एकूण ३० जीबी डेटा मिळतो. यूजर्स हा डेटा कोणत्याही लिमिटशिवाय एका दिवसात देखील वापरू शकतात. Jio चा २०१ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ३० दिवस असून, यात एकूण ४० जीबी डेटा मिळतो. प्लानमधील ४० जीबी डेटा यूजर्स कधीही वापरू शकतात. Jio चा २५१ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये एकूण ५० जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ३० दिवस आहे. Jio चा ५४९ रुपयांचा प्लान जिओच्या ५४९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. प्लानमधील हाय स्पीड डेटा समाप्त झाल्यानंतर इंटरनेट ६४ Kbps स्पीडने चालेल. प्लानमध्ये एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. या प्लानच्या अन्य फायद्यांबद्दल सांगायचे तर यामध्ये ओटीटी बेनिफिट्स मिळतात. प्लानमध्ये १ वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile सबस्क्रिप्शन दिले जात आहे. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चा देखील अॅक्सेस मिळतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30QZGg8
Comments
Post a Comment