iPhone: iPhone 12 ची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जवळपास २८,००० रुपये, मग तुम्हाला का द्यावे लागतात दुप्पट पैसे, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : चा फक्त वैशिष्ट्यांमुळेच नाही तर किंमतीमुळेही जगभरात चर्चेत असतो . पण तुम्हाला माहित आहे का की, ज्या फोनची क्रेझ जगभरात आहे त्या फोनचे पार्ट्स अॅपलनेच बनवलेले नाहीत. iPhone चे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या कंपन्या बनवतात. या भागांची किंमत काय आहे आणि आयफोन एकत्रित करण्यासाठी किती खर्च येतो याबद्दल क्वचितच लोकांना माहित असेल. वाचा: डिस्प्प्लेवर खर्च : टोकियो स्थित रिसर्च स्पेशालिस्ट फोमलहॉट टेक्नो सोल्युशन्सने त्यांच्या संशोधनात या फोनच्या उत्पादन खर्चाविषयी सांगितले आहे, ज्यात फोनची किंमत आणि बाजारातील किंमत यांच्यात मोठी तफावत आहे. पण, कर, आयात शुल्क आणि इतर अनेक कारणांमुळे ही तफावत वाढते. मॉडेमची किंमत : आयफोनमधील सर्वात महाग भाग म्हणजे मॉडेम. त्याच्या 5G मॉडेमची किंमत सुमारे $९० आहे, जी भारतीय चलनानुसार सुमारे ६७०० रुपये आहे. कॅमेरा खर्च : iPhone बहुतेक मॉडेल्समध्ये Sony चा कॅमेरा वापरतो. मध्ये Sony चा कॅमेरा देखील आहे. त्याची किंमत सुमारे $८ म्हणजेच ६०० रुपयांपर्यंत आहे. डिस्प्ले शुल्क : आता जर या फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये सॅमसंगचा OLED डिस्प्ले वापरण्यात आला आहे, त्याची किंमत जवळपास $७० म्हणजेच जवळपास ५२०० रुपये इतकी आहे. इतर भागांची किंमत : याशिवाय, phone चे अनेक भाग दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेत बनवले जातात. हे भाग आणि त्याचे असेंब्ली समाविष्ट करून, iPhone 12 ची एकूण किंमत सुमारे २७,५०० रुपयांपर्यंत जाते. यानंतर कंपनी वेगवेगळ्या देशांमध्ये हा फोन वेगवेगळ्या दराने विकते. भारतात iPhone 12 ची किंमत वेगवेगळ्या प्रकारांनुसार सुमारे ५५ ते ७० हजार रुपये आहे. म्हणूनच इतका मोठा फरक: भारतात वेगवेगळ्या करांमुळे या फोनची किंमत खूप वाढते. उदारहणार्थ iPhone 13 भारतात आयात केला तर त्यावर २२.५ टक्के कस्टम ड्युटी लागू होते. याशिवाय त्यावर जीएसटीही आकारला जातो. iPhone साठी जीएसटीच्या सध्याच्या दरानुसार, खरेदीदाराला सुमारे ११ हजार रुपयांचा जीएसटी भरावा लागतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31gOzx5

Comments

clue frame