नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात वारंवार डेटा लीकच्या घटना समोर आल्या आहेत. आता या यादीत Inc चे नाव जोडले गेले आहे. १२ लाख यूजर्सचा झाल्याची माहिती GoDaddy ने दिली आहे. १२ लाख अॅक्टिव्ह व इनअॅक्टिव्ह मॅनेज्ड यूजर्सचा डेटा लीक झाला आहे. यामध्ये यूजर्सच्या ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरचा समावेश आहे. वाचा: GoDaddy Inc ही एक इंटरनेट डोमेन रजिस्ट्रेशन आणि वेब होस्टिंग कंपनी आहे. कंपनीने म्हटले आहे की, मॅनेज्ड होस्टिंगमध्ये अनाधिकृत थर्ड पार्टी अॅक्सेस आढळला होता. डेटा लीक फिशिंग अटॅकमुळे झाला. कंपनीने पुढे म्हटले आहे की, सुरुवाती तपासात आढळले की, सप्टेंबरमध्ये कोम्प्रोमाइज्ड पासवर्डद्वारे अॅक्सेस मिळवला गेला. मूळ WordPress Admin पासवर्ड, जो प्रोव्हिजनिंग दरम्यान सेट करण्यात आला होता, तो समोर आला आहे. तसेच, क्रेडेंशियल वापरणाऱ्यांसाठी कंपनीने अशा पासवर्डला रिसेट केले आहे. अॅक्टिव्ह ग्राहकांच्याबाबतीत sFTP, डेटाबेस यूजरनेम आणि पासवर्ड एक्सपोज झाले. कंपनीने माहिती दिली की, त्यांनी दोन्ही पासवर्ड रिसेट केले आहेत. कंपनीनुसार, काही अॅक्टिव्ह ग्राहकांच्या SSL प्रायव्हेट की देखील लीक झाल्या आहेत. अशा सर्व ग्राहकांसाठी नवीन सर्टिफिकेट जारी करून इंस्टॉल केले जात आहे. तसेच, याबाबतचा तपास सुरू असून, ज्या ग्राहकांना यामुळे समस्या झाली आहे त्यांच्याशी संपर्क केला जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xePqKI
Comments
Post a Comment