सॅमसंगच्या या स्मार्टफोनला खरेदी करा २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत, पाहा जबरदस्त ऑफर

नवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) देशातील प्रमुख प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. यूएसमध्ये सुरू असलेल्या ब्लॅक फ्राय डे सेल (Black Friday Sale) सेलचे भारतीय व्हर्जन अमेझॉनवर सुरू आहे. अमेझॉनच्या Fab Phones Fest मध्ये तुम्हाला स्मार्टफोनवर धमाकेदार सूट मिळत आहे. अॅपल पासून विवो पर्यंत सर्व टॉप ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स. Samsung Galaxy M32 5G ला खरेदी करा २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत सॅमसंगच्या या १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेजच्या ५ जी फोनची मार्केट मध्ये किंमत २३ हजार रुपये आहे. परंतु, अमेझॉनवरून याला २० हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. तुम्हाला या डील मध्ये ३ हजार रुपयाचा कूपन डिस्काउंट सुद्धा मिळेल. यानंतर या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये होईल. जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तसेच तुम्ही एक्सचेंज करीत असाल तर १४ हजार ९०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. एसबीआय क्रेडिट कार्ड पेमेंट केल्यास ७५० रुपयांपर्यंत डिस्काउंट आणखी मिळवू शकता. त्यानंतर या फोनची किंमत २३४९ रुपये होईल. Vivo Y33s वर मिळवा १८ हजारांहून जास्त सूट विवोच्या या दमदार स्टोरेजच्या लेटेस्ट स्मार्टफोनला तुम्ही १८ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. या फोनची खरी किंमत २१ हजार ९९० रुपये आहे. जर तुम्हाला या डील मध्ये एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास १४ हजार ९०० रुपयाचा फायदा होईल. एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ७५० रुपयांपर्यंत सूट मिळेल. याप्रमाणे एकूण मिळून तुम्हाला १८ हजार ६५० रुपयाची बचत करता येवू शकते. iPhone 13 Mini ला खरेदी करा ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत अॅपलचा लेटेस्ट आयफोन खरेदी करायचा असल्यास अमेझॉनच्या फॅब फोन्स फेस्ट मध्ये iPhone 13 Mini ला तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. या फोनची किंमत ६९ हजार ९०० रुपये आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ६ हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. तसेच स्मार्टफोनच्या बदल्यात म्हणजेच एक्सचेंज केल्यास १४ हजार ९०० रुपयांपर्यंत बचत करता येवू शकते. आयफोन १३ मिनी तुम्ही ४९ हजारात खरेदी करू शकता. ८ हजारात खरेदी करा OnePlus Nord CE 5G वनप्लसचा लेटेस्ट स्मार्टफोनची मार्केट मध्ये किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या डीलमध्ये कोणतीही सूट मिळत नाही. परंतु, जर तुम्ही जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्ही १६ हजार ९०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. या फोनची किंमत ८ हजार ९९ रुपये होईल. या डीलमध्ये तुम्हाला अनेक बँक ऑफर, कॅशबॅक, नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन सुद्धा मिळतो. Xiaomi 11 Lite NE 5G ला खरेदी करा स्वस्तात शाओमीच्या ३१ हजार ९९९ रुपयांच्या ५ जी फोनला अमेझॉनवरून २६ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. जर तुम्हाला जुना फोन एक्सचेंज करायचा असेल तर तुम्ही १९ हजार ९०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट कार्डचा तुम्ही वापर केल्यास तुम्हाला २ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १२५० रुपयाची सूट मिळते. हा सेल २८ नोव्हेंबर पर्यंत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lc54BM

Comments

clue frame