नवी दिल्ली : प्रत्येकजण कमी बजेटमध्ये दमदार फीचर्स येणारा शोधत असतो. जर तुम्हीही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल व १० हजार रुपयांपर्यंत बजेट असल्यास ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. १० हजार रुपयांच्या रेंजमध्ये ६००० एमएएच आणि ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणाऱ्या फोन्सविषयी जाणून घेऊया. वाचा: चे स्पेसिफिकेशन्स Infinix Hot 10S स्मार्टफोनमध्ये ६.८२ इंच एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात मीडियाटेक हीलियो जी८५ प्रोसेसरसह ६ जीबीपर्यंत रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी यात रियरला ४८ मेगापिक्सल+ २ मेगापिक्सल + एआय लेंस दिली आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. Infinix Hot 10S ची किंमत Infinix Hot 10S स्मार्टफोनचे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर ९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. चे स्पेसिफिकेशन्स Tecno Spark 7T स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंच एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. सोबतच, मीडियाटेक हीलियो जी३५ चिपसेट, ४८ मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि ६००० एमएएचची बॅटरी मिळते. Tecno Spark 7T ची किंमत Tecno Spark 7T च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला तुम्ही ९,९९९ रुपये किंमतीत फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरून खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cEkI46
Comments
Post a Comment