Amazon Offer: फीचर्समध्ये आयफोनला टक्कर देतो Samsung चा ‘हा’ स्मार्टफोन, ३३ हजार रुपये डिस्काउंटसह खरेदीची संधी
नवी दिल्ली : फीचर्सच्याबाबतीत आयफोनला टक्कर देणारा सॅमसंगचा ५जी स्वस्तात उपलब्ध आहे. अॅमेझॉनवर स्मार्टफोन ३३ हजार रुपये डिस्काउंटसह मिळत आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि ऑफरविषयी जाणून घेऊया. वाचा: Samsung Galaxy S21 Ultra 5G ची किंमत सॅमसंगच्या या शानदार स्मार्टफोनची किंमत १,२८,९९९ रुपये असून, २३ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर १,०५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनला आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट/क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास १० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळते. तसेच, फोनवर १४,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. Samsung Galaxy S21 Ultra 5G चे स्पेसिफिकेशन्स Galaxy S21 Ultra 5G स्मार्टफोमध्ये शानदार क्वाड रियर कॅमेरा दिला आहे. याचा मुख्य कॅमेरा १०८ मेगापिक्सल आहे. या व्यतिरिक्त १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइट कॅमेरा आणि दोन १० मेगापिक्सल ड्यूल पिक्सल कॅमेरा दिला आहे. तसेच, फ्रंटला ४० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ६.८ इंच FHD डायनॅमिक एमोलेड 2X डिस्प्ले मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. ५जी ड्यूल सिम सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड वी१० ओएसवर काम करतो. यात Exynos २१०० octa core प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. या फोनवर १ वर्षाची मॅन्यूफॅक्चरर वॉरंटी आणि बॅटरीसह इन-बॉक्स एक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरंटी मिळते. फोनसोबत बॉक्समध्ये एडाप्टर, सिम इजेक्टर पिन, यूजर मॅन्यूअल, चार्जिंग केबल मिळते. फोनला ब्लॅक रंगात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FMtM3o
Comments
Post a Comment