WhatsApp युजर्सना लवकरच मिळणार Undo Status फीचर, काय असेल यात खास, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : WhatsApp युजर्सना सर्वात जास्त आवश्यक असलेले एक अपडेट लवकरच रोलआऊट होऊ शकते. आत्तापर्यंत जर चुकून स्टेटस अपडेट झाले तर ते डिलीट होण्याच्या प्रक्रियेत बराच वेळ जायचा, आणि तेवढ्या वेळात कॉन्टॅक्ट लिस्टमधील बरेच लोक ते व्हॉट्सअॅप स्टेटस पाहून घेतात . पण आता एक नवीन व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट दिले जात आहे, ज्यामुळे नको असलेल्या पोस्ट व्हॉट्सअॅप स्टेटस डिलीट करता येतील. हे एक प्रकारचे क्विक डिलीट बटण असेल, जे व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट ताबडतोब डिलीट करण्याचा पर्याय देईल. वाचा: तुम्ही फास्ट मोडमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस डिलीट करू शकाल व्हॉट्सअॅप अपडेट्सचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइट च्या रिपोर्टनुसार, बीटा टेस्टिंगसाठी व्हॉट्सअॅप अनडू हा पर्याय रिलीज करण्यात आला आहे. जे उर्वरित युजर्ससाठी लवकरच रोल आउट होऊ शकते. ही स्टेट्स पाठवा बटणाच्या राइड बाजूला असेल. व्हॉट्सअॅप अँड्रॉइड बीटा व्हर्जन २.२१.२२.६ मध्ये स्टेटस अपडेटसाठी WhatsApp चे Undo बटण उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅप अँड्रॉइड बीटा व्हर्जन २.२१.२२.५ मधील विशिष्ट बीटा टेस्टरला हे फिचर दिले जात आहे. व्हॉट्सअॅप स्टेटस डिलीट करण्याचा पर्याय आधीच उपलब्ध आहे. पण अपडेट आल्याने व्हॉट्सअॅप स्टेटस जलद डिलीट होण्यास मदत होईल. WhatsApp व्ह्यू वन्स फीचर : व्हॉट्सअॅपने अलीकडेच व्ह्यू वन्स अपडेट जारी केले आहे, जे तुमचे चॅट सुरक्षित करते. याचा अर्थ, एकदा तुम्ही एकदा दृश्य वैशिष्ट्यांमध्ये पोस्ट पाहिली की, ती व्हॉट्सअॅप पोस्ट आपोआप हटवली जाते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jBy84T

Comments

clue frame