OnePlus सह Samsung आणि 'या' कंपनीच्या स्मार्टफोन्सवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, ऑफर मर्यादित काळासाठी, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : सेल पुन्हा एकदा सुरू झाला असून आता त्याला Final Days असे नाव देण्यात आले आहे. याआधी सुरू झालेल्या Amazon च्या सेलमध्ये तुमचा आवडता स्मार्टफोन खरेदी करणे तुम्ही चुकवले असेल तर लवकरच तुमच्याकडे दुसरी संधी आहे. Amazon चा हा सेल २ नोव्हेंबरला संपणार असून यादरम्यान स्मार्टफोनवर ४० टक्क्यांपर्यंत सूट मिळविण्याची संधी आहे. वाचा: ई-कॉमर्स वेबसाइट Amazon च्या या सेल दरम्यान, OnePlus, Samsung, Apple, Xiaomi सह अनेक स्मार्टफोन कंपन्यांना डिव्हाइसवर आकर्षक ऑफर आणि डील मिळत आहेत. याशिवाय, तुम्ही इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकाल. Samsung Galaxy M12: Samsung Galaxy M12 चा हा स्मार्टफोन सेल दरम्यान लिस्ट करण्यात आला आहे आणि दिवसाच्या डीलनुसार त्याची किंमत ९४९९ रुपये दाखवण्यात आली आहे, तर जुन्या स्मार्टफोनची किंमत १२९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ६००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, मागील पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले आहे. iQOO फोनवर ३० % पर्यंत सूट Amazon च्या सेल दरम्यान हा स्मार्टफोन ८ GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज सह खरेदी करता येईल. Amazon वर दिलेल्या लिस्टिंगनुसार, त्याची किंमत १८९९० रुपये आहे. हा भारतात स्नॅपड्रॅगन 768 प्रोसेसर सह येणारा फोन आहे. हा 5G मोबाईल आहे. यात ६.५८ इंच डिस्प्ले आहे, जो १२० hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. OnePlus 9 Pro 5G देखील कमी किमतीत उपलब्ध: OnePlus 9 Pro 5G हा एक ट्रेडिंग स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन सध्या सेल दरम्यान ६०९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय २००० रुपयांचे अतिरिक्त कूपन ऑफ देखील उपलब्ध आहे. या किंमतीत ८ GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. यात हॅसलब्लॅडने डिझाइन केलेला रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच, यात ४५०० mAh बॅटरी आहे, या सेलमध्ये Redmi Note 10, Redmi Note 10S, Samsung Galaxy M32 5G आणि 108-मेगापिक्सेल कॅमेरासह Redmi Note 10 Pro Max पर्यंतचा समावेश आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vMcCPX

Comments

clue frame