सकाळी लवकर उठण्यापासून ते झोपेपर्यंत, अशी आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांची लाइफस्टाइल

नवी दिल्ली : हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असून, त्यांना आपल्या नवनवीन आयडियांसाठी ओळखले जाते. कोणत्याही यशस्वी व्यक्तीसाठी नियोजन हे खूप महत्त्वाचे असते. सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या यांचे डेली रुटीन काय आहे, याबाबत जाणून घेऊया. वाचाः Elon Musk यांच्याबाबत सांगितले जाते की ते कामाबाबत खूपच गंभीर असतात व कामासाठी ते जेवण देखील सोडतात. एवढेच नाही तर ते रात्री प्रोडक्शन फ्लोरवरच झोपतात. त्यांची सकाळची सुरुवात ७ वाजता होते. मस्क केवळ ६ ते ७ तास झोपतात. ते सांगतात की, कमी झोपल्यास त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो. झोपेतून उठल्यानंतर आंघोळकरून सर्वातआधी कॉफी घेतात. सकाळी घाई असल्याने अनेकदा नाश्ताही करत नाहीत. ज्यावेळी नाश्ता करतात, त्यावेळी ऑमलेट खातात. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, शॉवर घेणे त्यांना महत्त्वाचे वाटते. विना शॉवर योग्य उठत नाही. सकाळी उठल्यानंतर शॉवर घेतल्याने दिवसभरातील आवाहानांना सामोरे जाण्याची तयारी होते. त्यानंतर ते आपल्या मुलांना शाळेत पाठवतात व स्वतः कामावर जातात. Elon Musk यांचा दावा आहे की, ते आठवड्याला ८० ते १०० तास काम करतात. यात ते स्किलसेट डिझाइन आणि इंजिनिअरिंगवर लक्ष देतात. मध्ये ९० टक्के वेळ डिझाइन आणि टेस्लासाठी जवळपास ६० टक्के वेळ या कामात जातो. Elon Musk हे मल्टी टास्कर असून, ते फोन अथवा ईमेल जास्त पाहत नाहीत. ते स्वतः मान्य करतात की व्यस्त असल्याने आहारावर अधिक लक्ष देता येत नाही. दुपारचे जेवण देखील ते मीटिंगनंतर करतात. ते वेळेला प्रचंड महत्त्व देतात व यामुळे अनावश्यक मीटिंगला देखील उपस्थित नसतात. २०१८ ला New York Times च्या एका रिपोर्टमध्ये मस्क आठवड्याला १२० तास काम करतात असा दावा करण्यात आला होता. तसेच, मुलांसोबत देखील ते जास्त वेळ घालवतात. त्यांनी मुलाचे नाव X Æ A-12 असे ठेवले आहे. रात्रीचे जेवण करायला त्यांना आवडते. Diet Coke देखील त्यांच्या आवडीचा आहे. रात्री १० नंतर घरी आल्यावर वाचन आणि अ‍ॅनिमेटेड चित्रपट पाहतात व रात्री झोपायला त्यांना जवळपास १ वाजतात. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mqxOYB

Comments

clue frame