बजेट किमतीत स्टायलिश स्मार्टवॉच लाँच , डिव्हाइसमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली : Tagg Verve Neo स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आली असून Tagg Verve मालिकेतील ही चौथी स्मार्टवॉच आहे, Tagg Verve मालिकेतील ही सर्वात हलकी आणि सर्वात मोठे डिस्प्ले असलेली स्मार्टवॉच असल्याचा कंपनीचा दावा आहे. Tagg Verve Neo भारतात १,८९९ रुपयांना सादर करण्यात आली असून त्याची विक्री ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवरून केली जाईल. Tagg Verve Neo २४x७ बॉडी टेंपरेचर मॉनिटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, रिअल-टाइम हार्ट रेट, SpO2 वैशिष्ट्याला सपोर्ट करते. यात रिमोट कॅमेरा, म्युझिक प्लेयर, एसएमएस आणि कॉल अलर्टसाठी सपोर्ट मिळेल. वाचा: ची वैशिष्ट्ये: TAGG Verve Ultra या वर्षी सप्टेंबरमध्ये 3D वक्र डिस्प्लेसह लाँच करण्यात आली. यानंतर तापमान सेन्सरसह Tagg Verve Plus , त्याचबरोबर Tagg Verve Neo स्मार्टवॉच Tagga ने लाँच आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, यात १० दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल. वॉचचे वजन फक्त २१ ग्रॅम आहे. तर डिस्प्ले १. ६९ इंच अल्ट्रा-वाइड IPS-LCD सह येतो. स्मार्टवॉच ५०० nits ब्राइटनेससह येते. यात १६ स्पोर्ट्स मोड आहेत. Tagg Verve Neo हे IP68 वॉटर रेझिस्टन्ससह सादर करण्यात आले आहे. TAGG Verve Neo स्मार्टवॉच हार्ट रेट मॉनिटरसह येते. वॉच तुम्ही झोपेत असताना तुमच्या हृदयाचे ठोके मोजण्याचे काम करते. यात SpO2 फीचर आहे. ज्याद्वारे शरीरातील रक्तातील ऑक्सिजनची पातळी ओळखता येते. तसेच त्यात मासिक पाळी ट्रॅकर देण्यात आला आहे. स्मार्टवॉचमध्ये १०० पेक्षा जास्त वॉचफेस आहेत. Tagg Verve Neo स्मार्टवॉच ब्लॅक, ब्लू आणि रोजगोल्ड या तीन रंगांमध्ये येईल. तसेच, त्यामध्ये १६ हून अधिक पट्ट्या देण्यात येणार आहेत. TAGG Verve Plus १२ महिन्यांच्या वॉरंटीसह येते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3b9mgTh

Comments

clue frame