नवी दिल्ली : ने आपला नवीन Infinix Smart 6 ला लाँच केले आहे. स्मार्ट ५ ला चांगली मागणी मिळाल्यानंतर आता या फोनला लाँच करण्यात आले आहे. कमी किंमतीत येणाऱ्या या फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी, जबरदस्त कॅमेरा आणि डिझाइन आहे. फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Infinix Smart 6 ची किंमत ची किंमत १२० डॉलर्स (जवळपास ९ हजार रुपये) आहे. फोन सध्या ठराविक बाजारातच उपलब्ध असून, ब्लॅक, ग्रीन आणि पर्पल सारख्या रंगात येतो. Infinix Smart 6 चे स्पेसिफिकेशन्स Infinix Smart 6 मध्ये ६.६ इंच मोठा आयपीएस एलसीडी नॉच डिस्प्ले दिला असून, याचे पिक्सल रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. यामध्ये २६६ पीपीआय पिक्सल डेंसिटी आणि १६ मिलियन रंग आहे. यात UNISOC SC९८६३A प्रोसेसर दिला असून, यासोबत २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. फोन अँड्राइड ११ गो एडिशनवर काम करतो. Infinix Smart 6 कॅमेरा Infinix Smart 6 ला नवीन डिझाइनसह सादर केले आहे. फोनमध्ये व्हर्टिकल कॅमेरा आयलँडच्या जागी स्क्वेअर शेप कॅमेरा मॉड्यूल दिला आहे. फोनमध्ये दोन कॅमेरा आणि एक फ्लॅश लाइट आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ८ मेगापिक्सल आणि एक ०.०८ सेकेंडरी कॅमेरा आहे. तर फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. Infinix Smart 6 बॅटरी इनफिनिक्स स्मार्ट ६ स्मार्टफोनमध्ये ४जी कनेक्टिव्हिटी आणि ड्यूल सिम सपोर्ट मिळतो. यात १० वॉट चार्जिंग स्पीडसह ५००० एमएएच बॅटरी दिली आहे. चार्जिंगसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट दिला आहे. यात रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेसआयडीचा सपोर्ट मिळतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GoQGzc
Comments
Post a Comment