शाओमीच्या सर्वात हलक्या व पातळ ५जी फोनवर मिळतेय तब्बल ६ हजारांची सूट, ऑफर मर्यादित कालावधीसाठी

नवी दिल्ली : ने काही दिवसांपूर्वीच ला लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की हा सुपर लाइटवेट आणि अल्ट्रा-स्लिम फोन आहे. याजे वजन १५८ ग्रॅम आणि जाडी ६.८१ एमएम आहे. दिवाळीच्या निमित्ताने मर्यादित कालावधीसाठी फोनवर ६ हजार रुपयांची सूट देत आहे. वाचा: ग्राहक Xiaomi 11 Lite NE 5G च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला २०,९९९ रुपयात खरेदी करू शकतात. फोनची किंमत २६,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २८,९९९ रुपयात येईल. फोन Diamond Dazzle, Jazz Blue, Tuscany Coral आणि Vinyl Black रंगात येतो. डिस्काउंट ऑफर Xiaomi 11 Lite NE 5G ला Mi India स्टोरवरून ६ हजार रुपये बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. Axis बँकेच्या क्रेडिट कार्डवर २ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट, १ हजार रुपये अतिरिक्त रिवॉर्ड एमआय कूपन आणि ५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. Xiaomi 11 Lite NE 5G ची एक्सेसरीज खरेदीवर १,५०० रुपये डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय ग्राहकांना २ हजार रुपयांचे मॅजिक पॉइंट्स देखील मिळतील. तसेच, दोन वर्ष एक्सीडेंटल आणि लिक्विड डॅमेजवर मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा दिली जात आहे. Xiaomi 11 Lite NE 5G चे स्पेसिफिकेशन्स Xiaomi 11 Lite NE 5G मध्ये ६.५५ इंच FHD एमोलेड डॉट डिस्प्ले दिला असून, यात एचडीआर१०+, १० बिट आणि डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट मिळतो. यात रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आणि टच सँपलिंग रेट २४० हर्ट्ज आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Corning Gorilla Glass 5 दिले आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. फोन MIUI १२.५ वर काम करतो. यामध्ये ६४ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंसचा सपोर्ट मिळतो. फ्रंटला २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी ४२५० एमएएचची बॅटरी मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mgMg5b

Comments

clue frame