याला म्हणतात ऑफर ! फक्त १०१ रुपयांत घरी आणा १५,००० रुपये किमतीचा 'हा' स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: सध्या फेस्टिव्ह सीजन सुरु असून लोक स्वत:साठी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहेत. जर तुम्ही देखील असाच विचार करत असाल तर Vivo ने तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. Vivo ची Festive Offer ७ नोव्हेंबर पर्यंत वैध असेल .या दरम्यान Vivo तुम्हाला फक्त १०१ रुपयांमध्ये फोन खरेदी करण्याची संधी देत आहे. जाणून घ्या सविस्तर. वाचा: Vivo X आणि Vivo V Series : जर तुम्ही Vivo X70 Series खरेदी केली आणि तुम्ही Citi बँक, ICICI बँक, Kotak Mahindra बँक, IDFC First Bank आणि HDB Finance कार्डने पैसे दिले तर तुम्हाला १० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. त्याचबरोबर या Series वर वन टाईम रिप्लेसमेंट ऑफर देखील मिळेल. ही ऑफर Vivo V21 5G(८ GB १२८ GB), Vivo V21 5G(८ GB+२५६ GB), V21E 5G(८ GB+१२८ GB) वर मिळू शकते. या दरम्यान, जर तुम्ही बजाज फायनान्सद्वारे १५,००० रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेला Vivo स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला फक्त १०१ रुपये देऊन फोन घरी आणण्याची संधी मिळेल. याशिवाय झेस्ट मनी ईएमआयद्वारे एक वर्षाची विस्तारित वॉरंटी दिली जात आहे. यासोबतच Jio ला १०,००० रुपयांचे फायदेही दिले जात आहेत. फोन नो कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी केला जाऊ शकतो. Vivo Y आणि Vivo V Series : V21E 5G(८GB+१२८ GB) आणि Vivo Y73 वर एक वेळ बदलण्याची ऑफर दिली जात आहे. जर, तुम्ही बजाज फायनान्सद्वारे १५,००० रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीचा कोणताही Vivo स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला १०१ रुपये पैसे देऊन फोन घरी आणण्याची संधी मिळेल. याशिवाय आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचडीबी फायनान्समधून फोन खरेदी केल्यास २,५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल. Zest Money EMI द्वारे एक वर्षाची विस्तारित वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय, Jio चे १०,००० रुपयांचे फायदेही उपलब्ध करून दिले जातील. हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GoWuJ3

Comments

clue frame