९८ रुपयात रोज १.५ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग, जिओचा हा सर्वात स्वस्त प्लान

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास प्लान आणला आहे. हा जिओचा ९८ रुपयाचा प्लान आहे. जिओची प्रतिस्पर्धी कंपनी एअरटेल आणि वोडाफोन आयडियाकडे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील असा प्लान नाही. जो या रिचार्ज प्लानला टक्कर देवू शकेल. १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीती एका एकमेव रिचार्ज प्लान आहे. ज्यात रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. जाणून घ्या जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये कोणकोणते फायदे मिळतात. ९८ रुपयाचा प्लान, २१ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग रिलायन्स जिओचा ९८ रुपयाचा प्लानची वैधता १४ दिवसाची आहे. जिओच्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच या प्लानमध्ये एकूण २१ जीबी डेटा युजर्संना मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. प्लानमध्ये युजर्संना एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. वोडाफोन आयडियाकडे १९ आणि ९९ रुपयाचे प्लान वोडाफोन आयडियाकडे आता सर्वात स्वस्त प्लान १९ रुपये आणि ९९ रुपयाचे आहेत. दोन्ही प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. १९ रुपयाच्या प्लानची वैधता २ दिवसाची आहे. यात २०० एमबी डेटा मिळतो. तर ९९ रुपयाच्या प्लानमध्ये १८ दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये एकूण २०० एमबी डेटा मिळतो. या दोन्ही प्लानमध्ये एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळत नाही. एअरटेलकडे १९ रुपयाचा रिचार्ज प्लान अनलिमिटेड प्लानमधय्े १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील एअरटेलचा १९ रुपयाचा रिचार्ज प्लान आहे. एअरटेलच्या १९ रुपयाचा रिचार्ज प्लानची वैधता २ दिवसाची आहे. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये २०० एमबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये एसएमएस पाठवण्याची सुविधा देत नाही. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pwd8jX

Comments

clue frame