नवी दिल्ली : ने भारतीय बाजारात एक वायरलेस Dots Slay ला सादर केले असून, याचे डिझाइन आयकॉनिक आहे. यामध्ये दमदार बॅटरी लाइफ आणि वॉइस कमांडचा सपोर्ट दिला आहे. ची किंमत २,१९९ रुपये आहे. मात्र, ऑफर अंतर्गत फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरून ७९९ रुपयात खरेदी करू शकता. यासोबत १ वर्षाची वॉरंटी देखील मिळते. वाचा: Ambrane Dots Slay मॅट ब्लॅक फिनिशसह येतात. वॉटर रेसिस्टेंटसाठी याला आयपीएक्स ४ रेटिंग मिळाले आहे. यात टचऐवजी बटन दिले आहे. Ambrane Dots Slay मध्ये ८ एमएम डायनॅमिक ड्रायव्हर दिले आहेत, याबाबत हाय बासचा दावा केला आहे. Ambrane Dots Slay मध्ये ६०० एमएएचची बॅटरी दिली आहे, जी ३८ तासांचा प्लेबॅक टाइम ऑफर करते. तर बड्सची बॅटरी लाइफ ८ तास आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी वी५.१ चा सपोर्ट मिळतो. तसेच, गुगल असिस्टेंट आणि सिरीचा सपोर्ट दिला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच दिशा पटानीला ब्रँड अँबेसडर बनवले आहे. फेस्टिव्ह सीझनमध्ये १० नवीन ऑडिओ प्रोडक्ट लाँच करण्याची कंपनीची योजना आहे. Ambrane ने काही दिवसांपूर्वी २७००० एमएएच बॅटरीसह येणारा पॉवरबँक लाँच केला होता. या पॉवरबँकला Stylo सीरिज अंतर्गत लाँच केले होते. या सीरिजमध्ये , Stylo 20K आणि Stylo 10K हे पॉवरबँक देखील येतात. यांची क्रमशः किंमत १,९९९ रुपये, १,४९९ रुपये आणि ८९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vMOY5P
Comments
Post a Comment