नवी दिल्ली : कंपनी ने पोस्टर जारी करत च्या भारतातील लाँचिंगबाबत घोषणा केली आहे. या सीरिजमधील Vivo X70, आणि ला ३० सप्टेंबरला भारतात सादर केले जाईल. या तिन्ही स्मार्टफोनला आधी चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचा: Vivo X70 सीरिजची संभाव्य किंमत रिपोर्टनुसार, एक्स ७० प्रो ची किंमत ८४,९९० रुपये असू शकते. या सीरिजचे बेस मॉडेल विवो एक्स ७० ची किंमत ४० ते ५० हजार रुपये असू शकते. तर विवो एक्स ७० प्रो ५० ते ६० हजार रुपये किंमतीत उपलब्ध होईल. कंपनीने अद्याप अधिकृत किंमतीचा खुलासा केलेला नाही. Vivo X70 विवो एक्स ७० स्मार्टफोनमध्ये ६५६ इंचाचा एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला जाईल. याचे रिझॉल्यूशन १०८०x२३७८ पिक्सल आहे. रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोन ड्यूल सिम स्लॉट व अँड्राइड ११ ओएससह येईल. तसेच, यात मीडियाटेक डायमेंसिटी १२०० प्रोसेसरचा सपोर्ट दिला जाईल. Vivo X70 Pro विवो एक्स ७० प्रो मध्ये ४,४५० एमएएचची बॅटरी आणि Exynos १०८० प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये एचडी डिस्प्ले आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, ८ मेगापिक्सल पेरीस्कोप लेंस आणि दोन १२ मेगापिक्सल सेंसर मिळेल. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. Vivo X70 Pro+ विवो एक्स७० प्रो प्लस स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला जाईल. याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज असेल. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८+ प्रोसेसरसह १२ जीबी रॅम दिली जाईल. यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, ४८ मेगापिक्सल Sony IMX५९८ अल्ट्रा वाइड अँगल लेंस, १२ मेगापिक्सल पोर्ट्रेट लेंस आणि ८ मेगापिक्सल टेलिफोटो लेंस मिळेल. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CHqQ6H
Comments
Post a Comment