Philips 8100 TV सीरिज भारतात लाँच, ४३ इंच, ५० इंच, ५५ इंचाच्या टीव्हीचा समावेश

नवी दिल्ली : फिलिप्सने आपल्या सीरिज अंतर्गत तीन नवीन मॉडेल भारतात सादर केले आहे. हे सर्व ४के अल्ट्रा एचडी स्क्रीनसह येतात. यामध्ये अँड्राइड टीव्हीचा सपोर्ट मिळेल. तसेच, डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी एटमॉसचा देखील सपोर्ट दिली आहे. फिलिप्स ८१०० टीव्ही सीरिज एचडीआर सपोर्टसह येते. वाचा: Philips 8100 TV सीरिजची किंमत 8100 TV सीरिजला ५५ इंच, ५० इंच आणि ४३ इंच या साइजमध्ये सादर केले असून, यांची क्रमशः किंमत ८९,९९० रुपये, ७९,९९० रुपये आणि ५९,९९० रुपये आहे. या महिन्याच्या अखेरीस टीव्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोरवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. Philips 8100 टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स Philips 8100 TV सीरिजमधील सर्व टीव्ही ४के अल्ट्रा एचडी एलईडी डिस्प्लेसह येतात. यात डॉल्बी एटमॉस आणि एचडीआर१०+ व्हीडिओ फॉर्मेट सपोर्ट दिला आहे. टीव्ही अँड्राइड १० टीव्ही ओएसवर काम करतो. यात गुगल प्ले स्टोरसह फिलिप्स अ‍ॅप गॅलेरी प्री-लोडेड मिळते. टीव्हीत , , डिज्नी+ हॉटस्टार सारखे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतील. सीरिजमधील सर्व टीव्ही बॉर्डरलेस डिझाइनसह येतात. यात गुगल क्रोमकास्ट इनबिल्ट आहे. तसेच, गुगल असिस्टेंट, ड्यूल बँड वाय-फाय सपोर्ट मिळतो. कंपनीने टीव्हीवर काही ऑफर्स देखील दिल्या आहे. Philips ५५ इंच ३के UHD टीव्ही ५५PUT८११५/९४ खरेदी केल्यास फिलिप्सचा ६,९९९ रुपयांचा वायरलेस हेडफोन मोफत मिळेल. या टीव्हीची किंमत ६९,९९० रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AMHnpC

Comments

clue frame