कन्फर्म! ३ दिवसानंतर येणार Oppo Reno6 Pro 5G Diwali Edition, काय असेल खास, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : Oppo दोन नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत असून कंपनी Oppo F19s सोबत, या महिन्यात Reno6 Pro 5G Diwali Edition भारतात सादर करणार आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला भारतात Reno 6 मालिका लाँच केली होती, ज्यात डायमेन्सिटी १२०० प्रोसेसरद्वारे संचालित मानक Reno 6 Pro 5G चा समावेश आहे. स्पेशल एडिशन मॉडेल पुढच्या आठवड्यात देशात लाँच होण्याचे आता कन्फर्म झाले आहे. या आगामी प्रीमियम-मिड रेंज फोनमध्ये काय विशेष असू शकते? पाहा डिटेल्स. वाचा: Oppo Reno6 Pro 6G Diwali Edition पुढील आठवड्यात येणार : Oppo Reno6 Pro 5G च्या दिवाळी एडिशन लाँचची पुष्टी कंपनीनेच केली आहे. विशेष आवृत्ती Reno 6 सीरीज मॉडेल २७ सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. कंपनीने प्रक्षेपणाची वेळ दुपारी ३ वाजता निश्चित केली आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, त्याच तारखेला Oppo F19s देखील लाँच करण्यात येणार आहे . या दोन नवीन स्मार्टफोन व्यतिरिक्त, कंपनी एन्को बड्सचे नवीन कलर व्हेरिएंट लाँच करण्याची तयारी करत आहे. Oppo Enco Buds एकाच पांढऱ्या रंगाच्या पर्यायात लाँच करण्यात आले आहेत. परंतु, वर नमूद केलेल्या लाँच तारखेला कंपनी एनको बड्सचा नवीन निळ्या रंगाचा पर्याय सादर करेल. नवीन TWS इयरबड्सची किंमत कदाचित व्हाईट कलर व्हेरिएंट सारखीच असेल, म्हणजे १,९९९ रुपये. आत्तापर्यंत, Oppo ने Reno 6 Pro 5G Diwali Editiion साठी २७ सप्टेंबर लाँच तारीख जाहीर केली आहे. नवीन फोनमध्ये नवीन हार्डवेअर किंवा डिझाईन अपग्रेड असतील की नाही हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. डिव्हाइसमध्ये नवीन हार्डवेअर ऐवजी विशेष दिवाळी-केंद्रित डिझाईन असण्याची शक्यता आहे. जर कंपनीने Reno 6 Pro 5G दिवाळी एडिशनचे स्पेसिफिकेशन मानक Reno 6 Pto 5G सारखे ठेवले तर, त्यात २ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह डायमेंसिटी १२०० प्रोसेसर असू शकते. हँडसेट ६४ एमपी ट्रिपल-रियर कॅमेरा आणि ३२ एमपी सेल्फी कॅमेरा देईल. वक्र धार आणि पंच-होल डिझाइनसह ६.५५ इंच FHD+ AMOLED डिस्प्लेची अपेक्षा युजर्स यात करू शकतात. तसेच, फोनमध्ये ४,५०० mAh ची बॅटरी मिळू शकते. पण, नवीन फोन नक्की काय ऑफर करणार हे पाहण्यासाठी मात्र प्रतीक्षाच करावी लागेल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CJ8Fxz

Comments

clue frame