जिओ यूजर्स मोफत पाहू शकतात Disney+ Hotstar, ‘या’ दोन स्टेप्स फॉलो करा आणि घ्या चित्रपट-सीरिजचा आनंद

नवी दिल्ली : Disney+ Hotstar ने भारतात आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहे. याच पार्श्वभूमीवर Airtel, आणि ने Disney+ Hotstar लाँच केले आहे. टेलिकॉम कंपन्यांकडे डिज्नी+ हॉटस्टारसह येणारे तीन-चार प्लान्स आहेत. तुम्ही केवळ रिचार्ज करून मोफत डिज्नी+ हॉटस्टारचा आनंद घेऊ शकता. तुम्ही जर जिओ यूजर्स असाल तर तुम्हाला मोफत डिज्नी+ हॉटस्टार पाहता येईल. वाचा: Disney+ Hotstar अ‍ॅप सुरू करण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो
  • यासाठी सर्वात प्रथम ग्राहकांना नवीन लाँच झालेल्या पॅकसह आपल्या मोबाइल नंबरवर रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर Disney+ Hotstar अ‍ॅप डाउनलोड करा व मोबाइल नंबरने साइन इन करा.
  • साइन इन केल्यानंतर ग्राहकांना अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी माहिती द्यावी लागेल.
Reliance Jio Disney+ Hotstar प्लान या पॅक्सला क्रिकेट पॅक देखील म्हटले जाते. कारण यामध्ये ग्राहकांना मोफत क्रिकेटचा देखील आनंद घेता येतो. या प्लान्सची किंमत ४९९, ६६६, ८८८ आणि २,५९९ रुपये आहे. Jio चा ४९९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये ग्राहकांना ६ जीबी अतिरिक्त डेटासह दररोज ३ जीबी डेटा मिळतो. २८ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सह १० जिओ अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो. सोबतच, डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. Jio चा ६६६ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ६६ दिवस आहे. प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळते. तसेच, एक वर्षासाठी Disney+ Hotstar पाहता येईल. Jio चा ८८८ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. प्लानमध्ये अतिरिक्त ५ जीबी डेटा दिला जातो. तसेच, दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळते. प्लानमध्ये एक वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. Jio चा २,५९९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा दिली जाते. यात ३६५ दिवसांसाठी Jio अ‍ॅप आणि Disney+ Hotstar चा अ‍ॅक्सेस मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i2cZ3g

Comments

clue frame