नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन कंपनी आपल्या जगभरातील यूजर्सला शानदार गिफ्ट देणार आहे. यामुळे यूजर्सचा स्मार्टफोन पुन्हा नव्यासारखा होईल व त्यांचा फोन वापरण्याचा अनुभव देखील अधिक चांगला होईल. वाचा: कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला स्मार्टफोन लाँच केला होता. यासोबतच, कंपनीने अपडेटची घोषणा केली आहे. मात्र, त्यावेळी जागतिक स्तरावर हे अपडेट रोल आउट करणार असल्याची घोषणा नव्हती केली. मात्र, आता कंपनी सर्व यूजर्ससाठी नवीन अपडेट जारी केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनी सुरुवातीला चौथ्या तिमाहीच्या आधी ९ स्मार्टफोन्ससाठी MIUI १२.५ एन्हांस्ड अपडेट करणार आहे. या स्मार्टफोनला मिळेल अपडेट ज्या स्मार्टफोन्सला सर्वात प्रथम अपडेट मिळणार आहे त्यामध्ये Mi 11, , , , Mi 11X, Mi 10T Pro, Mi 10T, Mi 10 Pro आणि Mi 10 चा समावेश आहे. भारतात कोणते स्मार्टफोन उपलब्ध? वरील ९ पैकी ८ स्मार्टफोन्स भारतात उपलब्ध आहे. मात्र, कंपनीने कोणत्या क्षेत्रासाठी MIUI १२.५ एन्हांस्ड अपडेट जारी करणार आहे याची माहिती दिलेली नाही. MIUI १२.५ एन्हांस्ड अपडेटमध्ये काय असेल नवीन?
- कंपनीने घोषणा केली होती की, MIUI १२.५ एन्हांस्ड अपडेट हे अॅप्लिकेशनससाठी ऑल-अराउंड ऑप्टिमाइजेशन सादर करेल.
- MIUI १२.५ एन्हांस्ड अपडेट हे एक लिक्विड स्टोरेज मॅकेनिझ्मसोबत येईल. वेळोवेळी सिस्टमला रिस्पॉनिस्वह देखील बनवले. याशिवाय रॅमचा योग्यरित्या उपयोग करण्यासाठी अल्ट्रा-फाइन मेमरी मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रीत करेल.
- चा दावा आहे की, नवीन अल्गोरिद्मचा वापर करून सिस्टम रिसोर्सेसला योग्यरित्या वाटप करेल.
- Xiaomi ने म्हटले आहे की, यूजर्सकडून सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या गोष्टीला प्राथमिकता मिळेल. तसेच, बॅकग्राउंडमध्ये चालणारे काही अॅप्लिकेशन्स देखील बंद करते. यामुळे CPU चा वापर कमी होता व विजेची देखील बचत होते.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jlhy9Q
Comments
Post a Comment