कॉलिंग फंक्शन-कॅमेरा कंट्रोलसह Timex Fit 2.0 स्मार्टवॉच भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली: Timex ने नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच करून उत्पादन लाइनअपचा विस्तार केला आहे. भारतात Timex Fit 2.0 ची किंमत ५,९९५ रुपये असून हे डिव्हाइस ब्लू, ग्रे आणि ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. ग्राहक हे कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकतात. या नव्याने लाँच झालेल्या वॉचमध्ये इतर स्मार्टवॉचपेक्षा काय नवीन आहे जाणून घ्या. वाचा: Timex Fit 2.0 ची वैशिष्ट्ये : Timex च्या या नवीन स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग फीचर देण्यात आले आहे. यासह, रक्त ऑक्सिजन सेन्सर, स्लीप ट्रॅकर आणि ब्लड प्रेशर ट्रॅकिंग सारखे मॉडर्न वैशिष्ट्य देखील त्यात देण्यात आले आहे. या घड्याळात क्रियाकलाप ट्रॅकिंगसाठी सात क्रीडा पद्धती देखील आहेत. Timex Fit 2.0 मध्ये ४५ मिमी डायल आहे आणि उजव्या बाजूला नेव्हिगेशनसाठी एकच बटण आहे. कॅमेरा कंट्रोलची सुविधा : Timex Fit 2.0 मध्ये , युजर्सना सात दिवसांची बॅटरी मिळेल. याशिवाय यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही देण्यात आली आहे. या घड्याळात म्युझिक प्लेबॅक कंट्रोल आणि कॅमेरा कंट्रोलची सुविधाही मिळेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या घड्याळाद्वारे कॉल देखील केले आणि प्राप्त केले जाऊ शकतात. यासोबतच युजर्सना Timex Fit 2.0 मध्ये अनेक वॉच फेसेस देखील मिळतील. या घड्याळाला पाणी, धूळ आणि घामाच्या प्रतिकारासाठी IP54 प्रमाणपत्र देखील आहे. वाचा: वाचा : वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ygEE5I

Comments

clue frame