जबरदस्त डील ! ५५ इंचचा 'हा' Smart Tv खरेदी करा तब्बल ७०,००० रुपयांची सूट मिळवून, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : तुम्ही जर घर किंवा ऑफिससाठी मोठी स्क्रीन असलेला अँड्रॉईड टीव्ही खरेदी करायच्या विचारात असाल पण, त्यासाठी एखाद्या सेल किंवा ऑफरची प्रतीक्षा करत असाल तर आता त्याची गरज नाही. कारण , आम्ही आज तुम्हाला असेच ५५ इंचाच्या अशा टीव्ही मॉडेलबद्धल सांगणार आहो. जे ६५ % च्या मोठ्या सूटसह खरेदी करता येईल. यापूर्वी अशी डील तुम्हाला इतर कुठेच मिळाली नसेल. पाहा डिटेल्स. वाचा : iFFALCON 55 inch 4K Ultra HD TV 55K71 (2021 Model) या ५५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीच्या पहिल्या प्रदर्शनाबद्दल बोलायचे झाले तर, हे टीव्ही मॉडेल ४ के अल्ट्रा एचडी म्हणजेच ३८४० x २१६० पिक्सेल रिझोल्यूशन, एचडीआर १० सपोर्ट आणि ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येते. तसेच, टीव्हीमध्ये ए + ग्रेड पॅनेल, अल्ट्रा-एचडी, मायक्रो-डिमिंग सपोर्ट उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटी, रॅम आणि स्टोरेज: टीव्हीमध्ये ३ HDMI पोर्ट आणि २ USB पोर्ट देण्यात आले आहेत. या ५५ इंच टीव्ही मॉडेलमध्ये ग्राहकांना २ जीबी रॅमसह १६ जीबी स्टोरेज देखील मिळेल. iFFALCON Tv ला डॉल्बी ऑडिओ पॉवर स्पीकर्ससह ३० W साउंड आउटपुट मिळते. या ५५ इंचाच्या अँड्रॉईड टीव्हीच्या खास वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर, हे डिव्हाइस हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल अँड्रॉइड ९.० वर काम करते. टीव्ही नेटफ्लिक्स, यूट्यूब, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या अॅप्सला सपोर्ट करते. iFFALCON TV किंमत : iFFALCON टीव्ही मॉडेल ६५ टक्केच्या मोठ्या सूटनंतर ३६,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या टीव्ही मॉडेलवर ७०,००० रुपयांची बचत होईल. इतर पर्याय : ४० हजारांपेक्षा कमी बजेटमध्ये ५५ इंच कोडक टीव्ही (55UHDX7XPRO) मॉडेल देखील आहे, ज्याची किंमत ३५,९९९ रुपये आहे. तर , ५५ इंच Hisense Tv मॉडेल (55A71F) ची किंमत ३९,९९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BiCggs

Comments

clue frame