प्रचंड महाग! सेलच्या आधीच Samsung Galaxy Buds 2 ची किंमत लीक, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : लवकरच भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सेलच्या आधीच या इयरबड्सच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. हे ट्रू वायरलेस स्टीरियो () असून, लीकनुसार Galaxy Buds 2 ची भारतात किंमत १३ हजार रुपये असू शकते. याची किंमत ओरिजिनल Galaxy Buds पेक्षा अधिक आहे. मात्र, जानेवारी २०२१ मध्ये लाँच झालेल्या Galaxy Buds Pro पेक्षा कमी आहे. रिपोर्टमध्ये इयरबड्सच्या किंमतीचा खुलासा झाला असून, कंपनीने अधिकृतपणे अद्याप माहिती दिलेली नाही. वाचा: Samsung Galaxy Buds 2 ची संभाव्य किंमत: काही रिपोर्टनुसार, Galaxy Buds 2 TWS इयरबड्सची किंमत १२,९९० रुपये असू शकते. जागतिक बाजारात या इयरबड्सला १४९.९९ डॉलर्स (जवळपास ११,१०० रुपये) मध्ये लाँच करण्यात आले होते. इयरबड्सला ग्रेफाइट, लँव्हेंडर, ऑलिव्ह आणि व्हाइट रंगात खरेदी करू शकता. ओरिजिनल Samsung Galaxy Buds ची किंमत ९,९९० रुपये आहे. तर गॅलेक्सी बड्स प्रो ची किंमत १५,९९० रुपये आहे. Samsung Galaxy Buds 2 चे फीचर्स: Samsung Galaxy Buds 2 मध्ये टू-वे ड्राइव्हर देण्यात आले आहे. यात वूफर देखील मिळेल. यामध्ये तीन मायक्रोफोन्स देण्यात आले असून, दोन अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशनसाठी वापरले जातात. स्पलॅश आणि वॉटर रेसिस्टेंटसाठी याला आयपीएक्स७ रेटिंग मिळाले आहे. इयरबड्स ब्लूटूथ वी५.२ कनेक्टिव्हिटीसह येतात. यामध्ये एक्सेलेरोमीटर, गायरोस्कोप, प्रॉक्सीमिटी सेंसर, हॉल सेंसर, टच सेंसर सारखे फीचर्स मिळतील. सिंगल चार्जमध्ये इयरबड्सची बॅटरी २९ तास टिकेल. ANC बंद असताना तुम्ही सलग ७.५ तास याचा वापर करू शकता. तर ANC सह २० तास बॅटरी टिकेल. यात ६१ एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. प्रत्येक इयरपीसला बॅटरी फीचर आहे. तसेच, केससाठी ४७२ एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. याची केस Qi वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zgOu8N

Comments

clue frame