नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स ऑफर करीत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स आणत आहेत. अनेक कंपन्यांनी स्वस्त प्लान्स आणले आहेत. ग्राहक अन्य कंपनीकडे जावू नये, यासाठी कंपन्या ग्राहकांना जास्त बेनिफिट देण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल सारख्या प्रमुख कंपन्यांचे एक प्रीपेड प्लान ऑफर करीत आहेत. या तिन्ही कंपन्याच्या प्लानची किंमत एक आहे. परंतु फायदे मात्र वेगवेगळे आहेत. जाणून घ्या डिटेल्स. Vi चा १९९ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडियाचा एक प्रीपेड प्लान असा आहे. ज्यात ग्राहकांना १९९ रुपयात २४ दिवसासाठी रोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच युजर्संना व्ही मूव्हीज, टीव्हीचे बेसिक अॅक्सेस मिळते. Airtel चा १९९ रुपयाचा प्लान एअरटेल २४ दिवसासाठी आपल्या ग्राहकांना रोज १ जीबी डेटा, रोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हाइस कॉल्स देत आहे. तसेच ग्राहकांना विंक म्यूझिक, फ्री हेलो ट्यून्स, एअरटेल एक्स स्ट्रीम आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे मोबाइल एडिशनचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. हे सर्व फक्त १९९ रुपयात मिळेल. जा १९९ रुपयाचा प्लान जिओ आपल्या ग्राहकासाठी १९९ रुपयात बाकीच्या कंपन्यापेक्षा जास्त काही देत आहे. याची वैधता २८ दिवसाची आहे. २८ दिवसांपर्यंत जिओ रोज ग्राहकांना १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस देतो. सोबत जिओचे सर्व अॅप्स जसे जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज आदीचे सब्सक्रिप्शन देत आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jlclyP
Comments
Post a Comment