नवी दिल्लीः इनफिनिक्स ने गेल्यावर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात Infinix Hot 10 स्मार्टफोन लाँच केला होता. या वर्षी कंपनी हॉट १० सीरीज मध्ये Hot 10 Play आणि Hot 10S स्मार्टफोनवरून पडदा हटवला होता. आता एका नवीन माहितीनुसार, कंपनी ला पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात लाँच करण्याची तयारी करीत आहे. लाँच आधीच सोशल मीडियावर या फोनची किंमत लीक झाली आहे. वाचा: मिळालेल्या माहितीनुसार, इनफिनिक्स हॉट ११ एस स्मार्टफोनला ४ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या दोन व्हेरियंट मध्ये उपलब्ध केले जाणार आहे. या व्हेरियंट ची किंमत अनुक्रमे ९ हजार ९९९ रुपये आणि १० हजार ९९९ रुपये असणार आहे. या किंमती पूर्णपणे लीकवर आधारित आहे. त्यामुळे या किंमतीत कमी जास्त लाँचिंगवेळी पाहायला मिळू शकते. अधिकृत लाँचिंगपर्यंत किंमतीसाठी वाट पाहणे हे चांगले आहे. कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे की, इनफिनिक्स हॉट ११ एस मध्ये मीडियाटेक हीलियो जी ८८ प्रोसेसर दिला जाणार आहे. याशिवाय, कंपनीने मिड सप्टेंबर महिन्यात लाँचिंग करण्याची माहिती दिली आहे. त्यामुळे कंपनी लवकरच या फोनच्या संबंधित टीझर जारी करू शकते. वाचा: इनफिनिक्स हॉट ११ एस च्या दुसऱ्या वैशिष्ट्ये बद्दल अजून काही माहिती मिळाली नाही. परंतु, फोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट दिला जावू शकतो. याशिवाय, ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत ट्रिपल रियर कॅमेरा आणि 6000mAh च्या बॅटरी सोबत १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जावू शकतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DsFIXI
Comments
Post a Comment