Huawei Nova Y60 स्मार्टफोन लाँच, प्री-ऑर्डरवर मोफत मिळेल हेडफोन-स्पीकर

नवी दिल्ली : स्मार्टफोनला दक्षिण आफ्रिकेत लाँच करण्यात आले आहे. हुवावेच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच डिस्प्ले आणि ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये कंपनीचा Histen ६.१ ऑडिओ आणि पॅनोरमिक ३डी साउंड एनहँसमेंट एक्सपिरियन्स मिळेल. या फोनविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Nova Y60: किंमत आणि उपलब्धता ला ३,०९९ ZAR (जवळपास १५,३०० रुपये) किंमतीत लाँच करण्यात आले आहे. फोन क्रश ग्रीन आणि मिडनाइट ब्लॅक रंगात येतो. फोन कंपनीच्या अधिकृत साइटवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असून, १ सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल. प्री-ऑर्डर केल्यास फोनसोबत ZAR ६९९ (जवळपास ३,४०० रुपये) किंमतीचा हेडफोन आणि ZAR ५९९ (जवळपास २,९०० रुपये) किंमतीचा HUAWEI CM510 मिनी स्पीकर ऐमरेल्ड ग्रीन मोफत मिळेल. Huawei Nova Y60: स्पेसिफिकेशन्स नोवा वाय६० अँड्राइड १० आधारित EMUI ११.०१ वर काम करतो. यामध्ये ६.६ इंच एचडी+ (७२०x१६०० पिक्सल) टीएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये मीडियाटेक हीलियो (एमटी६७६५) प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे ५१२ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये १३ मेगापिक्सल प्रायमरी, ५ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल आणि २ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेंसर मिळेल. हुवावे नोवा वाय६० मध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी आणि साइडला फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय ८०२.११ बी/जी/एन, ब्लूटूथ ५.१, युएसबी टाइप-सी, ३.५ एमएम ऑडिओ जॅक आणि जीपीएस मिळेल. फोनमध्ये प्रॉक्सिमिटी, एम्बियंट लाइट सेंसर आणि ग्रेव्हिटी सेंसर मिळतील. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kwX3pM

Comments

clue frame