Flipkart वर Apple डेज सेलला सुरुवात, अनेक iPhones वर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: iPhones चे अनेक मॉडेल्स स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी तुमच्याकडे आहे. फ्लिपकार्टवर Apple डे सेल सुरु असून हा सेल २८ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये , iPhone 12, सारख्या अनेक iPhone मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. सेलमध्ये iPhone 11 ५१,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल . वाचा: तसेच, या सेलमध्ये Mini ६७,९०० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यासाठी तुम्हाला HDFC बँक कार्ड किंवा EMI व्यवहार वापरावा लागेल. एचडीएफसी बँक कार्ड किंवा ईएमआय व्यवहारां बरोबरच त्यावर ६,००० रुपयांची सूट दिली जात आहे. Apple डेजच्या सेलमध्ये iPhone XR वर देखील मोठी सवलत दिली जात आहे. या सेलमध्ये iPhone XR ४१,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. ही किंमत त्याच्या बेस मॉडेलसाठी असून ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. या सेलमध्ये iPhone 12 वर सूट देखील दिली जात आहे. iPhone 12 या सेलमध्ये ७७,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. यामध्ये ६,००० रुपयांची इन्स्टंट सूट देखील समाविष्ट आहे. iPhone SE 2020 देखील या सवलतीत भरपूर सवलतीसह उपलब्ध करण्यात आले आहे. या Apple Days सेलमध्ये iPhone SE ६४ GB स्टोरेज मॉडेल ३२,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. तर १२८ GB स्टोरेज मॉडेलसाठी तुम्हाला ३४,९९९ रुपये खर्च करावे लागतील. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3B9GuHl

Comments

clue frame