खूपच कमी किंमतीत लाँच झाली Crossbeat ची नवीन स्मार्टवॉच, मिळेल ब्लूटूथ कॉलिंग फीचर

नवी दिल्ली : ने भारतात आपली नवीन Ingnite S3 ला लाँच केले आहे. ही स्मार्टवॉच स्क्वेअर शेपमध्ये येते. यात जिंक एलॉय मेटल बॉडीचा वापर करण्यात आला आहे. स्मार्ट वॉच कार्बन ब्लॅक, आइस सिल्वर, सी ग्रीन, स्पोर्टी ग्रीन, स्पोर्टी रेड आणि स्पोर्टी ग्रे अशा ६ रंगात येते. फोनमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच कॉलिंगसाठी फोनची गरज नाही. वाचा: स्मार्टवॉचमध्ये अनेक हेल्थ आणि फिटनेस फीचर्स जसे की स्ट्रेस मॉनिटर आणि विमेन हेल्थ ट्रॅकर देण्यात आले आहे. Crossbeat स्मार्टवॉचमध्ये इंडस्ट्री लीडिंग १.७ इंच हाय डेफिनिशन स्क्रीनचा सपोर्ट मिळतो. Crossbeat Ingnite S3 स्मार्टवॉचची किंमत Crossbeat Ingnite S3 स्मार्टवॉचची किंमत ५,४९९ रुपये आहे. मात्र, इंट्रोडक्टरी प्राइसमध्ये ४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ३० ऑगस्टपासून एक्सक्लूसिव्ह Corssbeats.com वेबसाइटवरून प्री-बुक करू शकता. स्मार्टवॉच ऑफलाइन आणि ऑनलाइन व्यतिरिक्त Amazon India वर देखील विक्रीसाठी उपलब्ध असेल. या वॉचवर ग्राहकांना १२ महिन्यांची वॉरंटी मिळेल. Crossbeat Ingnite S3 स्मार्टवॉचमध्ये १० स्पोर्ट मोड, टच सेंसर्ससह मॅक्सिमम रिस्पॉन्स सपोर्ट मिळेल. Crossbeat Ingnite S3 स्मार्टवॉचची वैशिष्ट्ये Crossbeat Ingnite S3 स्मार्टवॉच स्ट्रेस मॉनिटर सपोर्टसह येते. तर अशाप्रकारच्या इतर वॉच २४x७ हर्ट रेट ट्रॅकरसह येतात. Ingite S3 स्मार्टवॉचमध्ये हर्ट रेट ट्रॅकर सपोर्टसह अनेक डेटाचा देखील सपोर्ट मिळतो. याशिवाय हर्ट रेटचा ग्राफ देखील तुम्हाला वॉचमध्ये पाहता येईल. यात स्ट्रेस लेव्हलची देखील माहिती मिळतो. या ग्राफला स्मार्टवॉचच्या स्ट्रेस मॅनेजमेंट अ‍ॅप्लिकेशनद्वारे कनेक्ट करून अन्य गोष्टींबाबत माहिती घेऊ शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zmcmb9

Comments

clue frame