नवी दिल्ली : Flipkart ने आपल्या ग्राहकांसाठी 'Back To College ' इलेक्ट्रॉनिक Sale ची घोषणा केली आहे. हा सेल २७ ऑगस्टपासून सुरू झाला असून ३० ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये तुम्ही लॅपटॉप, स्मार्टवॉच, गेमिंग मॉनिटर, हेडफोन, टॅब्लेटसह अनेक प्रोडक्ट्सवर बंपर सवलतीचा लाभ घेऊ शकता. 'बॅक टू कॉलेज' इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये ८० टक्के सूट दिली जात आहे. यासह, तुम्ही ५ टक्के इन्स्टंट कॅशबॅक, नो-कॉस्ट ईएमआय आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर एक्सचेंज डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता. जाणून घ्या कोणत्या प्रोडक्ट्सवर तुम्हाला किती सूट मिळू शकते. वाचा: स्मार्टवॉचवर ६० % सूट फ्लिपकार्टच्या बॅक टू कॉलेज सेलमध्ये, Apple, Realme आणि इतर अनेक कंपन्यांकडून तुम्हाला स्मार्टवॉचवर ६० टक्के सूट मिळू शकते. ७० % सूट गेमिंग डिव्हाइसेसवर जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल तर तुम्ही ७० टक्के सूट देऊन Sony , हायपरएक्स आणि इतर अनेक कंपन्यांकडून घरी गेमिंग डिव्हाइसेस घरी आणू शकता. तसेच गेमिंग मॉनिटर्सवर ४५ % सूट देखील मिळवू शकता. एज्युकेशन टॅब्लेटवर ४५ % पर्यंत सूट मिळवा आजच्या काळात, ऑनलाईन अभ्यासाचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि अशा परिस्थितीत, जर तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या मुलासाठी एक चांगले टॅबलेट शोधत असाल, तर या Saleमध्ये तुम्ही टॅब्लेट ४५ %च्या सूटसह खरेदी करू शकता. हेडफोन मिळवा ६० % सवलतीसह फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्ही स्वत: साठी Boat, OnePlus आणि इतर अनेक कंपन्यांकडून हेडफोन ६० टक्के सवलतीत खरेदी करू शकता. लॅपटॉपवर ४५ % पर्यंत सूट मिळवा जर तुमची मुले घरून काम करत असतील किंवा ऑनलाईन शिकत असतील तर तुम्ही तुमच्यासाठी एक उत्तम लॅपटॉप खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला लॅपटॉपवर ४५ टक्के सूट मिळू शकते. यासोबतच प्रीमियम लॅपटॉपवर ३० टक्क्यांपर्यंत सूटही दिली जात आहे. यासह, जर तुम्हाला इंटेल कोर i5 प्रोसेसर असलेला लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुम्ही त्यावर ३५ % पर्यंत सूट मिळवू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sXy9no
Comments
Post a Comment