शॉपिंगची आवड असणाऱ्यांसाठी Amazon चे जबरदस्त फीचर !आधी खरेदी पेमेंट नंतर , पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ई-कॉमर्स वेबसाइट ने आपल्या काही निवडक ग्राहकांसाठी Buy Now Pay Later हा पर्याय सादर केला आहे. हे वैशिष्ट्य सुरू केल्यामुळे, ग्राहक $ ५० किंवा त्यापेक्षा जास्त खरेदीची एकूण किंमत मासिक पेमेंटमध्ये विभागून देऊ शकतील. या सुविधेसाठी कंपनीने पेमेंट नेटवर्क सोबत भागीदारी केली आहे. सध्या, अमेरिकेत या वैशिष्ट्याची चाचणी केली जात आहे. Buy Now Pay Later वैशिष्ट्य लवकरच इतर देशांमध्ये आणले जाण्याची अपेक्षा आहे. वाचा:

अॅफर्मने म्हटले आहे की, ग्राहकांना त्यांच्या खरेदीची एकूण किंमत आधीच दर्शवली जाईल आणि एकूण खर्चापेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. तसेच, ग्राहकांकडून उशिरा किंवा लपवलेले शुल्क आकारले जाणार नाही. Amazon ने अजून किती युजर्स Buy Now Pay Later फीचर वापरण्यास सक्षम आहेत याची माहिती अद्याप शेअर केलेली नाही. तसेच, हे फिचर सर्व ग्राहकांसाठी कधी आणले जाईल याबाबत देखील माहिती देण्यात आलेली नाही. Affirm ही US- आधारित स्टार्टअप कंपनी आहे, जी ग्राहकांना छोट्या हप्त्यांमध्ये खरेदी करण्याचा पर्याय प्रदान करते. सध्या, कंपनी एडिडास, शॉपिफाई आणि वॉलमार्ट सारख्या लोकप्रिय ब्रँडशी संबंधित आहे. हे विशेष वैशिष्ट्य गेल्या वर्षी केले लाँच Amazon ने गेल्या वर्षी भारतातील ग्राहकांच्या सोयीसाठी अॅलेक्सा सपोर्टसह व्हॉईस कमांड फीचर सादर केले. व्हॉईस कमांडसह, ग्राहक बोलून शॉपिंग तसेच शोध घेऊ शकतात. व्हॉईस कमांड फक्त इंग्रजी भाषेला समर्थन देते. हे वैशिष्ट्य अॅमेझॉन कार्टसह दिसेल. माईकच्या डिझाईनमध्ये बांधलेल्या या फिचरवर क्लिक केल्यानंतर ते अॅक्टिव्हेट होईल आणि तुम्ही बोलून शॉपिंग करू शकाल. हे वैशिष्ट्य हिंदी भाषेत उपलब्ध केले जाऊ शकते असा अंदाज लावला जात आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kyRAz2

Comments

clue frame