बहुप्रतीक्षित 5G फोन Samsung Galaxy M32 5G बजेट किमतीत भारतात लाँच, पाहा फोनची किंमत- फीचर्स

नवी दिल्ली : Samsung ने M सीरिजचा नवीन 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला असून हा कंपनीचा सर्वात शक्तिशाली मिड-रेंज 5G स्मार्टफोन आहे. Samsung Galaxy M32 5G मध्ये १२ 5G बँड देण्यात आले असून यासह, कंपनीने २ वर्षांसाठी फोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टमचा आधार दिला आहे. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच, फोन स्लेट ब्लॅक आणि स्काय ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. वाचा: Samsung Galaxy M32 5G : किंमत आणि ऑफर Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोन ६GB + १२८GB आणि ८GB + १२८GB स्टोरेज पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनची सुरुवातीची किंमत १८,९९९ रुपये आहे. फोनची विक्री २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल. आयसीआयसीआय क्रेडिट कार्डने खरेदी केल्यावर फोनवर २,००० रुपयांची सूट मिळेल. तसेच, ईएमआय पर्यायावर फोन खरेदी करता येईल. Samsung Galaxy M32 5G : वैशिष्ट्ये Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच एचडी + इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले मिळेल. फोन प्रीमियम आणि आकर्षक डिझाइनमध्ये येतो. यात १ TB विस्तारीत स्टोरेज सपोर्ट आहे. तसेच फोन नो सिक्युरिटीसह येतो. Dimensity ७२० प्रोसेसर सपोर्ट फोन मध्ये देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड ११ आधारित वन यूआय ३.१ वर काम करेल. Galaxy M32 5G स्मार्टफोनमध्ये ४८ एमपी क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. त्याचा मुख्य कॅमेरा ४८ MP चा असेल. याशिवाय, ८ एमपी १२० डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, ५ एमपी मॅक्रो लेन्स आणि २ एमपी लाइव्ह फोकस समर्थित आहेत. तर ,फ्रंटमध्ये सेल्फीसाठी १३ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी गॅलेक्सी M32 5G स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे, जी १५ W फास्ट चार्जिंगद्वारे समर्थित आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38eqcQV

Comments

clue frame