सॅमसंगचा स्वस्त फोन Samsung Galaxy A03s लवकरच येतोय भारतात, सपोर्ट पेज लाइव्ह

नवी दिल्लीः सॅमसंग भारतात आपल्या A-सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. Samsung Galaxy A-3s स्मार्टफोनचे सपोर्ट पेज कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाची कंपनी लवकरच या फोनला भारतात लाँच करू शकते. सध्या सॅमसंग कंपनीने यासंबंधीची कोणतीही माहिती शेयर केली नाही. कंपनीने नुकताच सॅमसंग गॅलेक्सी ए २२ ५जी ला भारतात लाँच केले आहे. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी ए ० ३ ला आधी मल्टिपल सर्टिफिकेशन मिळाले आहे. फोनला इंडोनेशियाच्या TKDN सर्टिफिकेशन साइटवर पाहिले गेले आहे. या लिस्टिंगवरून फोनमध्ये ४ जी नेटवर्क कनेक्टिविटी मिळणार असल्याची माहिती आहे. सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर बनलेल्या सपोर्ट पेजवरून गॅलेक्सी ए०३ एसचे मॉडल नंबर शिवाय, आणि अन्य काही माहिती समोर आली नाही आहे. गॅलेक्सी ए०३ एस मॉडल नंबर SM-A037F/DS आहे. वाचाः अनेक लिस्टिंगवरून फोनचे फीचर्सची माहिती मिळाली आहे. FCC वेबसाइटवर लिस्टिंगवरून या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळणार आहे. फोनमध्ये १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकते. गॅलेक्सी ए ०३ ला या मॉडल नंबर सोबत बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर लिस्ट केले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर, ४ जीबी रॅम ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे. सॅमसंगच्या या फोनला रॅम आणि ऑप्शन सोबत लाँच केले जावू शकते. फोनमध्ये अँड्रॉयड ११ सोबत OneUI 3.0 स्किन मिळण्याची शक्यता आहे. वाचाः याशिवाय, गॅलेक्सी ए ०३ एस स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले आणि फ्रंट मध्ये नॉचच्या आत ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. फोनमध्ये रियरवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. हँडसेट मध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत २ मेगापिक्सलचे दोन सेन्सर असू शकतात. हँडसेट मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट, फिंगरप्रिंट सेन्सर आणि ३.५ एमएम ऑडियो जॅक मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j0fZN7

Comments

clue frame