याला म्हणतात ऑफर ! ३२ हजारांचा iQOO7 Monster Orange व्हेरिएंट मिळतोय २० हजारांपेक्षा कमी किमतीत , पाहा डिटेल्स
नवी दिल्ली. iQOO 7 चा मॉन्स्टर ऑरेंज कलर ऑप्शन काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच करण्यात आला असून हा फोन आधीपासूनच स्टॉर्म ब्लॅक आणि सॉलिड आइस ब्लू रंगात उपलब्ध आहे. पण, तुम्ही जर iQOO 7 मॉन्स्टरचा आकर्षक Orange Color व्हेरियंट खरेदी करायच्या विचारात असाल तर, तुमच्याकडे एक मस्त संधी आहे. नवीन प्रकारात इतर दोन पर्यायांसारखेच डिझाइन घटक आहेत. मॉन्स्टर हा शब्द मागील पॅनेलवर चांगले ठळकपणे दर्शविला गेला आहे. पाहा डिटेल्स. वाचा: iQOO 7 Monster Orange Color व्हेरियंटची किंमत नवीन iQOO 7 मॉन्स्टर ऑरेंज कलर व्हेरियंटची किंमत ३१,९९० रुपये आहे, जी इतर पर्यायांप्रमाणेच आहे. ही किंमत फोनच्या ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज मॉडेलसाठी आहे.तर, फोनच्या १२ जीबी + २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ३५,९९० रुपये आहे. नंतरचा पर्याय अद्याप Amazon इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध नाही. ऑफर्सबद्धल सांगायचे तर, खरेदीदारांना Amazon वर २,००० रुपये सवलत कूपन, एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्ड वापरावर ५०० रुपयांची सवलत, नो कॉस्ट ईएमआय (नऊ महिने ) सारखे ऑफर्स देण्यात येत आहे. यात सहा महिने विनामूल्य स्क्रीन रिप्लेसमेंटचा लाभ देखील घेता येईल. इतकेच नव्हे तर तुम्हाला १३,५०० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह iQOO 7 फोन केवळ १८,५९० रुपयात खरेदी करता येईल. स्मार्टफोन कंपनीचा अपर मिड-रेंजर आहे. जो, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० चिपसह येतो आणि मी ११ एक्स, वनप्लस ९ आर, रियलमी एक्स ७ मॅक्स आणि अगदी वनप्लस नॉर्ड २ सह स्पर्धा करतो हे ६H२-इंच फुल एचडी + एएमओएलईडी डिस्प्लेसह १२० Hz रीफ्रेश रेटसह येते. फोटोग्राफीसाठी, त्यात ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड / मॅक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मोनो लेन्स आहे. फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सेल आहे. iQOO 7 एक ४,४४० एमएएच बॅटरी पॅक करतो. जी, ६६ डब्ल्यू फास्ट चार्जिंगला समर्थन देते. हा फोन एंड्रॉइड ११ वर आधारीत फनटॉच ओएस ११.१ वर काम करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, ग्रेफाइट स्तरित लिक्विड कूलिंग सिस्टमसह इतरही बरेच फीचर्स देण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zy1XsI
Comments
Post a Comment