नवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सध्या सेल सुरू आहे. या दरम्यान, अनेक स्मार्टफोन्सला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. आयफोन १२ ला स्वस्त खरेदी करण्याच्या संबंधी आम्ही आधीच तुम्हाला माहिती दिली आहे. आज आम्ही तुम्हाला आयफोन १२ मिनीच्या डिस्काउंट संबंधी खास माहिती देत आहोत. Flipkart Big Savings Days सेल मध्ये या फोनवर १७ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यानंतर या फोनवर १२ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. वाचाः फोनची किंमत आणि ऑफर्स फ्लिपकार्ट सेल मध्ये स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. या स्मार्टफोनची वास्तविक किंमत ६९ हजार ९०० रुपये आहे. परंतु, १२ हजार रुपयांच्या सूट नंतर या फोनला तुम्ही ५७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. ही किंमत ६४ जीबी व्हेरियंटची आहे. याच प्रमाणे डिस्काउंट नंतर आयफोन १२ मिनीच्या १२८ जीबी व्हेरियंटची किंमत ६२ हजार ९९९ रुपये आणि २५६ जीबी व्हेरियंटची किंमत ७२ हजार ९९९ रुपये झाली आहे. वाचाः iPhone 12 Mini चे फीचर्स या फोनला तीन कलर ऑप्शन, ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. आयफोन १२ सीरीज मधील हा सर्वात छोटा स्मार्टफोन आहे. प्रोसेसर आणि फीचर्स मध्ये हा कुठेच मागे नाही. फोनमध्ये कंपनीचा सर्वात पॉवरफुल A14 Bionic प्रोसेसर दिले आहे. फोन ड्युअल सिम ५ जी कनेक्टिविटी सोबत येतो. यात ५.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ज्यावर सेरेमिक शील्ड ग्लास दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा आणि सिंगल फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरात १२ मेगापिक्सलचा प्लस १२ मेगापिक्सलचे दोन लेन्स आणि सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा डॉल्बी एचडीआर व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलायजेशन सपोर्ट करतो. डिव्हाइस मध्ये वाय फाय ६ आणि ब्लूटूथ ५.० कनेक्टिविटीसोबत येतो. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zG1FzW
Comments
Post a Comment