नवी दिल्लीः दिग्गज टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाने काही नवीन पोस्टपेड लाँच केले आहेत. खास कॉर्पोरेट कस्टमर्ससाठी आणलेल्या या प्लान्सची किंमत २९९ रुपयांपासून सुरू होते. या Business Plus पोस्टपेड प्लान्स ची किंमत २९९ रुपये, ३४९ रुपये, ४९९ रुपये, महिना आहे. प्लानमध्ये डेटा आणि कॉलिंगसारखी सुविधा शिवाय अन्य काही एक्सक्लूसिव्ह बेनिफिट्स दिले आहेत. वाचाः २९९ रुपयांचा Business Plus पोस्टपेड प्लान २९९ रुपये महिना असलेल्या या बिझनेस प्लस पोस्टपेड प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंग मिळते. ग्राहकांना प्रत्येक महिना ३००० एसएमएस दिले जाते. सोबत एक महिन्यासाठी एकूण ३० जीबी डेटा दिला जातो. ग्राहकांना याशिवाय, मोबाइल सिक्यॉरिटी, Vi Movies & TV Classic अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन, आणि Vi Caller Tunes ची सुविधा दिली जाते. वाचाः ३४९ रुपयांचा Business Plus पोस्टपेड प्लान ३४९ रुपयांचा प्लान हा जवळपास २९९ रुपयांच्या प्लान सारखाच आहे. यात थोडा जास्त डेटा दिला जातो. या प्लानमध्ये तुम्हाला एक महिन्यासाठी ४० जीबी डेटा मिळेल. २९९ रुपयांच्या प्लानपेक्षा १० जीबी डेटा ज्सात दिला जातो. याशिवाय, अनलिमिटेड लोकल व नॅशनल कॉलिंग, ३००० एसएमएस, मोबाइल सिक्यॉरिटी, Vi Movies & TV Classic अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन, आणि Vi Caller Tunes ची सुविधा दिली जाते. वाचाः ३९९ रुपयांचा Business Plus पोस्टपेड प्लान बाकी दोन्ही प्लान प्रमाणे या प्लानची सुविधा सारखीच आहे. यात फरक म्हणजे डेटाचा आहे. ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ६० जीबी डेटा दिला जातो. बाकी २९९ रुपयांच्या प्लान सारखेच बेनिफिट्स आहेत. याशिवाय, अनलिमिटेड लोकल व नॅशनल कॉलिंग, ३००० एसएमएस, मोबाइल सिक्यॉरिटी, Vi Movies & TV Classic अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन, आणि Vi Caller Tunes ची सुविधा दिली जाते. वाचाः ४९९ रुपयांचा Business Plus पोस्टपेड प्लान हा चौथा आणि सर्वात महाग नवीन बिझनेस प्लस पोस्टपेड प्लान आहे. यात जास्त डेटा सोबत Disney+ Hotstar VIP चे वर्षभराचे सब्सक्रिप्शन दिले जाते. प्लानमध्ये एकूण १०० जीबी डेटा, अनलिमिटेड लोकलव नॅशनल कॉलिंग आणि ३००० एसएमएस दिले जाते. मोबाइल सिक्यॉरिटी, Vi Movies & TV Classic अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन, आणि Vi Caller Tunes ची सुविधा दिली जाते. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iM6ssN
Comments
Post a Comment