जिओचा जबरदस्त प्लान, १ वर्ष वैधतेसह मिळेल दररोज ३ जीबी डेटा-कॉलिंग-एसएमएसचा लाभ

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने यूजर्ससाठी अनेक नवीन प्लान्स सादर केले आहे. यासोबतच कंपनीने एक वर्ष वैधतेसह नवीन प्लान लाँच केला आहे. या प्लानची किंमत ३,४९९ रुपये आहे. एक वर्ष वैधतेसह येणारे अनेक प्लान्स जिओकडे आहेत. महिन्याच्या प्लानच्या तुलनेत हे प्लान्स अधिक स्वस्त पडतात. वाचा: जिओचा ३,४९९ रुपयांचा प्लान च्या या प्लानची वैधता ३६५ दिवस असून, यात दररोज ३ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये एकूण १०९५ जीबी डेटा दिला जातो. दररोजचा डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ केबीपीएसने स्पीड मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. प्लानमध्ये JioTV, , JioNews, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन मिळेल. या प्लानमध्ये यूजर्सला दिवसाला ९.५८ रुपये खर्च करावे लागतात. चा २,६९८ रुपयांचा एअरटेलच्या या प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता ३६५ दिवस असून, यामध्ये एक वर्षासाठी Disney Hotstar VIP चे सबस्क्रिप्शन देखील मिळते. चा २,३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान वीआयच्या या प्लानमध्ये वर्षभरासाठी दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय वीकेंड डेटा रोल ओवर, एमपीएलवर गेम खेळण्यासाठी १२५ रुपयांचा बोनस आणि Vi Movies & TV चा अ‍ॅक्सेस मिळेल. Vodafone Idea चा २,५९५ रुपयांचा प्रीपेड प्लान या प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची देखील सुविधा मिळते. तसेच, प्लानमध्ये विकेंड डेटा रोलओवरसह प्रीमियम Zee5 सब्सक्रिप्शन आणि Vi Movies & TV चा अ‍ॅक्सेस मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zRNsQJ

Comments

clue frame