नवी दिल्ली : अॅमेझॉन आणि ब्लू ओरिजिनचे संस्थापक यांनी काही दिवसांपूर्वीच अंतराळ प्रवास केला. यानंतर आता बेझॉस यांनी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाला मानव अंतराळ मिशनसाठी २ अब्ज अमेरिकन डॉलर डिस्काउंट देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी पत्र लिहून कंपनीला बनवण्यास परवानगी दिल्यास २ बिलियन डॉलर डिस्काउंट दिले जाईल, असे म्हटले आहे. वाचाः जेफ बेझॉस यांनी एलॉन मस्क यांच्यासोबत सुरू असेलल्या स्पेस वॉरमुळे नासासमोर हा प्रस्ताव ठेवला आहे. एप्रिलमध्ये नासाने ह्यूमन लँडिंग सिस्टमचे २.९ बिलियन डॉलर्सचे कॉन्ट्रॅक्ट स्पेसएक्सला दिले होते. मात्र, आणि डायनेटिक्स या दोन कंपन्यांनी नासाविरोधात तक्रार केली आहे. बेझॉस यांना नासाचे अॅडमिनिस्ट्रेट बिल नेल्सन यांना पत्र लिहित म्हटले आहे की, कंपनी नासाची भांडवलाची समस्या दूर करेल व एक सुरक्षित आणि टिकाऊ लँडरची निर्मिती करेल. जेणेकरून, अमेरिकन नागरिकांना चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचण्यास मदत होईल. बेझॉस पुढे म्हणाले की, माझ्या मते हे मिशन महत्त्वपूर्ण आहे. मी यासाठी योगदान देण्यासाठी सन्मानित असल्याचे अनुभवत आहे. मी हे करण्यास आर्थिकरित्या सक्षम असल्याने कृतज्ञ वाटते. वाचाः ब्लू ओरिजिन हे मिशन पूर्वपदावर आणण्यासाठी चालू आणि पुढील दोन आर्थिक वर्षातील २ अब्ज डॉलर्सपर्यंतचा खर्च माफ करण्यास तयार आहे. ब्लू ओरिजिन या कामासाठी एका ठराविक रक्कमेचा करार करेल. सोबतच, अतिरिक्त खर्च देखील स्वतः स्विकारेल व नासाला खर्चापासून दूर ठेवेल, असेही बेझॉस यांनी पत्रात म्हटले आहे. दोन लँडर प्रोटोटाइप (ब्लू ओरिजिनचे एक) स्विकारण्याची शक्यता होती. मात्र, अमेरिकन काँग्रेसने फंडमध्ये कपात केल्याने नासाने ब्लू ओरिजिन ऐवजी स्पेसएक्सची निवड केली. यानंतर ब्लू ओरिजिनने नासावर आपल्या ब्लू मून नावाच्या लॅडरच्या प्रस्तावातील काही भाग चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप केला होता. मस्क यांनी एक ट्विट करत ब्लू ओरिजिनला उत्तर देखील दिले होते. मस्क यांनी हे लँडर वरती जाण्यास योग्य नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, हे कॉन्ट्रॅक्ट नासाच्या आर्टेमिस प्रोग्रामचा हिस्सा आहे. याचा उद्देश २०२४ पर्यंत चंद्रावर मानवाला पाठवणे हा आहे. वाचाः वाचाः वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f18Nis
Comments
Post a Comment